हे आहे जगातील ‘मोस्ट इंस्टाग्रामेबल’ कॅफे


एखाद्या हॉटेलमध्ये अथवा कॅफेमध्ये गेल्यावर आपण जेवणाचे, खाण्यासाठी ऑर्डर केलेल्या पदार्थांचे मस्त फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. वेगवेगळे पदार्थ चाखणे, त्याचे फोटो काढून सर्वांपर्यंत पोहचवणे हे अनेकांना आवडते. अर्थात असे फोटो पोस्ट केल्याने आपण सोशलम मीडियावर अक्टिव आहोत हे ही लोकांना समजते. मात्र लंडन आणि न्युयॉर्कमध्ये काही असे कॅफे आहेत जे खास अशाच सोशल मीडिया इन्फ्युलंसर्ससाठी बनली आहेत. हे कॅफे खास ग्राहकांना त्यांनी ऑर्डर केलेल्या जेवणाचा चांगला फोटो यावा यासाठी विनामुल्य कॅमेरा व हटके पदार्थ देखील ग्राहकांना देतात.

बीग 7 ट्रँव्हलच्या नवीन यादीनुसार, मोस्ट इंस्टाग्रामेबलचा किताब यंदा ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील स्पिडोस् कॅफेने पटकवला आहे.

हा किताब पटकवण्याचे कारण म्हणजे, हे हॉटेल विविध आकर्षक रंगामध्ये ग्राहकांना डिश सर्व्ह करत असतात.

बर्गरपासून ते बनाना पॅनकेकपर्यंत हे सर्वच फोटो तोंडाला पाणी आणतात. तसेच या कॅफेच्या मेन्यूमध्ये अनेक हटके पदार्थ देखील मिळतात.

याशिवाय या कॅफेचे आणखी एक आकर्षण म्हणजे हे कॅफे प्रसिध्द बोंडी बिचच्या किनाऱ्यावर आहे.

इंस्टाग्राम युजर्समध्ये हे आवडीचे ठिकाण आहे.

काही दिवसांपुर्वी अभिनेता ह्युज जॅकमनने देखील या कॅफेला भेट दिली होती.

Leave a Comment