एकही आरोपी नसल्यामुळे ओस पडले आहेत येथील कारागृह


या जगात कुठेही अपराध घडत नाही असा क्वचित एखादा देखील देश सापडू शकणार नाही असाच आपल्यापैकी अनेकांचा समज आहे. पण आम्ही जर आज तुम्हाला सांगितले की जगात असा देखील एक देश ज्याठिकाणी शुन्य अपराध आहेत. तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. कारण युरोप खंडात एक असा देश आहेत जेथे एकही अपराध घडत नाही. त्यात विशेष म्हणजे या देशात एकही असा आरोपी नाही ज्याला कारागृहात टाकता येईल. पण यामुळे या देशातील तुरुंग चक्क ओस पडले आहेत.

या जगात असे अनेक देश आहेत जेथे देशातील लोकसंख्येच्या 15 टक्के नागरिक तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. पश्चिम युरोपमधील नेदरलँडमध्ये गुन्हेगारी आकडा सातत्याने कमी होताना दिसत आहे. या देशातील गुन्हेगारी दर एवढा कमी झाला आहे की, तेथील कारागृह बंद होण्याच्या मार्गावर आहे. नेदरलँड देशाकडे सध्याच्या घडीला तुरुंगात टाकायला एकही आरोपी नाही. 2013 मध्ये फक्त 19 कैदी होते. 2018 पर्यंत या देशात एकही गुन्हेगार राहिला नाही.

यासंदर्भात 2016 साली टेलीग्राफ यूकेमध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, नेदरलँडच्या न्याय मंत्रालयाने सांगितले होते की, गेल्या पाच वर्षांमध्ये देशातील गुन्हेगारीत 0.9 टक्क्यापर्यंत घट होईल. नेदरलँडमधील कारागृह बंद झाल्यास दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात येतील. नेदरलँड हा जगातील सर्वात सुरक्षित देश होईल. पण रोजगारच्या दृष्टीकोनातून पाहिले तर तुरुंगात काम करणारे कर्मचारी बेरोजगार होतील.

नेदरलँडमधील कारागृह बंद झाले तर जवळपास 2 हजार लोकांच्या नोकऱ्या जातील. त्यातल फक्त 700 लोकांना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या इतर नोकऱ्यांचा लाभ मिळेल. या देशातील तुरुंग बंद झाली तर नेदरलँड एक देश, एक प्रणाली, एक सरकार आणि नागरिकांसाठी एक यशस्वी देश होईल. या देशातील रिकामी तुरुंग हा मुद्दा एवढा महत्त्वाचा झाला होता की, नेदरलँडला आपल्या सुविधा आणि व्यवस्था चालवण्यासाठी चक्क नॉर्वेवरून गुन्हेगारांना मागवण्यात आले होते.

गुन्हेगारांसाठी नेदरलँडमध्ये इलेक्ट्रॉनिक अँकल मॉनिटरिंग सिस्टम आहे. यात कैद्यांच्या पायाला एक असे डिवाइस लावले जाते, ज्यामुळे त्यांचे लोकेशन ट्रेस होऊ शकतं. हे डिवाइस रेडिओ फ्रीक्वेन्सी सिग्नल पाठवते. ज्यावरून गुन्हेगारांच्या लोकेशनबद्दल पूर्ण माहिती मिळते. जर एखादा कैदी तुरुंगातून पळण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याबद्दल अगदी काही सेकंदांमध्ये कळते. हे अँकल मॉनिटरिंग सिस्टम देशातील गुन्हेगारी दर कमी करण्यास सक्षम आहे. तिथे कैद्यांना दिवसभर बंद करून ठेवण्याऐवजी काम करायला सांगितले जाते. तसेच ठरवून दिलेल्या परिसरात मोकळे फिरायला देखील दिले जाते.

Leave a Comment