या व्यक्तीच्या प्रयत्नामुळे मोफत शिक्षण घेत आहेत 200 विद्यार्थी


गरीबीमुळे अनेक मुलं पुस्तके व स्टेशनरी खरेदी करू शकत नाही. अशा मुलांना चंदीगडचे शिक्षक संदीप कुमार मोफतमध्ये पुस्तके उपलब्ध करून देतात. यासाठी मागील दोन वर्षांपासून ते प्रत्येकाच्या घरी जातात व जुनी पुस्तके जमा करतात. संदीप आणि त्यांच्या टीमने आतापर्यंत 10 हजार पुस्तके जमा केली आहेत. या पुस्तकांद्वारे 200 पेक्षा अधिक विद्यार्थी अभ्यास करत आहेत.

संदीप कुमार हे ‘ओपन आय फाउंडेशन’ नावाने एक एनजीओ चालवतात. त्यांनी आतापर्यंत 4000 विद्यार्थ्यांना मदत केली असून, लवकरच ते 200 विद्यार्थ्यांना दत्तक घेणार असून, त्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची मदत करणार आहेत.


संदीप कुमार यांनी सांगितले की, त्यांनी सर्वात प्रथम याची सुरूवात जेबीटीची ट्रेनिंग घेत असतानाच सुरू केली. त्यांनी बघितले की, आर्थिक अडचणींमुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून पुस्तके व स्टेशनरी खरेदी करण्यासाठी पैसे नसतात. त्यांना या गोष्टीचे खूप वाईट वाटले व त्यांनी या मुलांसाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली.


संदीप आणि त्यांची टीम कॉलेज आणि शाळांमध्ये कॅम्प लावते. तेथे विद्यार्थ्यांना जर त्यांच्याकडे काही उपयोगी नसलेली पुस्तके असतील तर ती गरजूंसाठी दान करण्यास सांगतात. संदीप कुमार त्यांच्या या योजनेला सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहचवत आहेत. लोकांनी गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुढे यावे अशी त्यांची इच्छा आहे.

 

Leave a Comment