जुळीचपण दुसऱ्याचा जन्म तब्बल 11 आठवड्यानंतर


कझाकस्तान येथील एका महिलेने 11 आठवड्याच्या अंतराने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. या घटनेने डॉक्टर देखील आश्चर्यचकित झाले आहेत. 21 वर्षीय लिलिया कोनोवाल्वो हीने 24 मे एका अकाली मुलीला जन्म दिला तर 9 ऑगस्ट रोजी एका मुलाला जन्म दिला.

एक मुलगा आणि मुलगी अशा जुळ्यांना जन्म देण्याची घटना 50 मिलियनमधून एकदाच घडत असते. कझाक हेल्थ मिनिस्ट्रीनुसार, देशातील ही अशी पहिलीच घटना आहे.

गर्भवती झाल्यांतर 25 आठवड्यानंतरच लिलियाने टीनी नावाच्या मुलीला जन्म दिला. बाळाचे वजन हे 850 ग्राम होते. तिच्या मुलाचा जन्म त्यानंतर अडीच आठवड्यानंतर झाला. त्याचे वजन 2 किलो 900 ग्राम होते. लिलिया म्हणाली, तिच्या मुलाला या जगात येण्यासाठी काहीही घाई नव्हती.

त्या महिलेचे पोटात दोन गर्भाशये होते व दोन्ही बाळांची वाढ ही वेगवेगळ्या गर्भाशयांमध्ये होत होती. लिलियाने सांगितले की, मला हे कळाल्यावर खूप आश्चर्य वाटले. मला माझ्या अकाली जन्माला आलेल्या बाळांची काळजी होती. परंतू डॉक्टरांनी जे केले ते चमत्कारच आहे.

डॉक्टरांनी देखील ही घटना आश्चर्यकारक असल्याचे म्हटले आहे. अशी घटना दुर्मिळच आहे. खासकरून 11 आठवड्यांच्या अंतरानंतर बाळ जन्माला येणे हे आश्चर्यकारक असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

Leave a Comment