वैज्ञानिकांनी शोधला त्वचेमध्ये दुखण्याचा उगम


स्विडिश संशोधकानी एका अशा संवेदनशील अंगाचा शोध लावला आहे, ज्यामुळे त्वचेला कोणताही त्रास झाल्यावर लगेच वेदना जाणवते. या अंगामुळेच आपल्याला शरीरात वेदना जाणवत असते. जुन्या आजारांच्या वेदना देखील आपल्या याच अंगामुळे आजही जाणवतात. संशोधकांनी शोधलेले हे अंग ग्लिया पेशी आणि अनेक लेअर्स असणाऱ्या प्रोट्यूशियंसद्वारे बनलेल्या पेशी आहेत जे त्वेचत एक ऑर्गन बनवते. हा भाग वेदनेच्या प्रती संवेदशनशील पेशींच्या आजूबाजूला असतो आणि लेअर्समुळे त्वचेच्या वरच्या भागावर पसरते. त्यामुळे आपल्याला वेदना जाणवत असते.

हा शोध वेदनेविषयी गेली अनेक वर्ष सुरू असलेल्या शोधामध्ये मदत करेल.  नवनवीन औषधांमध्ये देखील याचा फायदा होईल. आज प्रत्येक पाच व्यक्तींपैकी एक व्यक्ती वेदनेने त्रासलेला आहे व त्यामुळे तो पेनकिलर सारखी औषधे घेतो.

स्टॉकहोमचे कारोलिंस्का इंस्टीट्यूटचे प्रोफेसर पैट्रिक अर्नफोर्स यांच्यानुसार, आपल्यासाठी सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, अनेक पेशी मिळून बनलेला हा भागच जुन्या वेदनेमागे कारणीभूत आहे का ? हा भाग अनेक प्रकारच्या पेशींपासून बनलेला आहे, जे तंत्रिका कोशिकांच्या आजूबाजूला असते.

पेट्रिकने सांगितले की, अभ्यासात समो वेदनेच्या प्रती संवेदनशिलता केवळ त्वचेच्या तंत्रिका तंतुंमध्ये नसते. वेदनेसाठी शोधण्यात आलेले नवीन अंग देखील जबाबदार आहे. हा शोध शारिरिक संवेदनाबद्दल आपले विचार बदलून टाकेल. नवीन समजूतींसह आता नवीन पेनकिलर तयार केले जातील.

ऑक्टोपस सारख्या आकाराचे या पेशी सक्रिय होतात तेव्हा एक इलेक्ट्रिकल फोर्स बनते व त्याच्या प्रतिक्रियेमुळे वेदना जाणवते. या अंगाला बनवणाऱ्या कोशिकांना बाहेरून आमंत्रित केले जाऊ शकते. संशोधनामध्ये सापडलेल्या त्या भागाला ब्लॉक केले व त्यानंतर जाणवले की,  वेदना कमी जाणवत आहेत.

Leave a Comment