इंग्लंडच्या 45 वर्षीय सायकलस्वार नील कँपबेलने 280 किमी प्रती तासाच्या वेगाने सायकल चालवत नवीन विश्व विक्रम केला आहे. याचबरोबर त्याने डच सायकलस्वाराचा 24 वर्ष जुना विक्रम देखील मोडला.
हा विक्रम बनवण्यासाठी कँपबेलला रनवेवर पोर्शे कारबरोबर सोडण्यात आले. ही शर्यत नॉर्थ यॉर्कशायर ते एलविंग्टन एअरफिल्डपर्यंत चालली.
शर्यतीमध्ये नीलने कारची बरोबरी देखील केली. नीलने ज्या सायकलचा वापर केला ती खास वेगाने चालण्यासाठीच बनवण्यात आली आहे. त्या सायकलची किंमत 15 हजार पाउंड (13 लाख रूपये) आहे.
विश्व विक्रम केल्यानंतर नीलने सांगितले की, आता एकमद निंवात वाटत आहे. त्यांच्या टीमने आश्चर्यकारकरित्या शानदार कामगिरी केली. 1995 मध्ये नेंदरलँडच्या सायकलस्वाराने 268.76 किमी वेगाने सायकल चालवली होती. तो विक्रम आतापर्यंत कायम होता. नील कँपबेलने तो विक्रम मोडित काढला.