या शहरात सुरू होणार ‘म्युझियम ऑफ आइस्क्रीम’


आइसक्रीमचे म्युझियम लवकरच न्युयॉर्कमध्ये सुरू करण्यात येणार असून, मनीष वोरा हा भारतीय व्यक्ती या म्युझियमचा सह-संस्थापक आहे.

हे म्युझियम 3 मजल्यांचे असणार असून, 25,000 स्केअर फूट एवढे मोठे असणार आहे. यामध्ये 13 नवीन शाखा सुरू करण्यात येणार असून, याशिवाय यामध्ये सर्वात मोठे स्प्रिंकल पूल देखील असणार आहे.

म्युझियम ऑफ आइस्क्रीम पुढील 18 महिन्यात न्युयॉर्कबरोबरच आणखी इतर शहरात देखील सुरू करण्यात येणार असल्याचे, सह-संस्थापक मनीष वोराने सांगितले आहे.


2016 पासून या म्युझियममध्ये बियॉन्से, जे-झेड, किम कार्डिशियन आणि केटी पेरी यासारखे सेलिब्रिटिज येऊन गेले आहेत. आतापर्यंत या म्युझियमला 1.5 मिलियन पेक्षा अधिक जणांनी भेट दिली आहे.


लाँच करण्यात येणाऱ्या नवीन म्युझियममध्ये अनेक नवनवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. यामध्ये फ्लोटिंग टेबल,  थ्री स्टोरी स्लाईड, जायंट स्कूप अशा गोष्टी असणार आहेत.

हे म्युझियम सर्वांसाठी या वर्षाच्या अखेर पर्यंत सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment