या हॉस्पिटलमधील झाडांमुळे सामान्य होतो रूग्णाचा रक्तदाब


हॉस्पिटल म्हटले की, औषधांचा वास, लोकांची गर्दी, रूग्णांची ये-जा या गोष्टी आपल्याला समोर दिसतात. अशा परिस्थितीत रूग्ण देखील तणावाखाली येत असतो. याच गोष्टी लक्षात घेऊन सिंगापूरच्या एक फर्मने असे हॉस्पिटल तयार केले आहे, जेथे रूग्ण येताच त्याचा तणाव व बल्ड प्रेशर देखील कमी होता.

सीपीजी कॉर्पोरेशन फर्मला सांगण्यात आले होते की, असे हॉस्पिटल बनवा, जेथे येताच रूग्णावरील तणाव नाहीसा होईल. यासाठी फर्मने मोठमोठ्या रूममध्ये 1000 पेक्षा जास्त झाडे लावली.

फर्मने दावा केला आहे की, हिरवळ हे मेंटल आणि फिजिकल हेल्थसाठी औषधांचे काम करते. येथे रूग्ण भाज्या उगवतात व झाडांची काळजी घेतात. खू टेक पुआट सिंगापूरच्या पाच प्रमुख हॉस्पिटल पैकी एक आहे. यामध्ये टैन टॉक सेंग हॉस्पिटल, सिंगापुर जनरल हॉस्पिटल, चांगी जनरल हॉस्पिटल आणि नॅशनल युनिवर्सिटी हॉस्पिटलचा समावेश आहे.

हॉस्पिटलची निर्मिती 2005 पासून सुरू आहे. 2010 मध्ये येथे उपचार सुरू झाले. हॉस्पिटलचे सदस्य स्टफिन किशनने सांगितले की, या हॉस्पिटलचे यश बघून मलेशिया, चीन आणि पाकिस्तानमध्ये देखील अशीच परियोजना सुरू करण्यासाठी प्रेरित झाले आहेत.

एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, पाकृतिक वातावरणामुळे रूग्णांचा शारिरिक आणि मानसिकतेमध्ये जलद सुधारणा होत आहे. येथील झाडे आणि त्यांच्या वासामुळे लोकांचे हे आवडते हॉस्पिटल झाले आहे.

रिसर्चर्स सांगतात की, हॉस्पिटलची निर्मिती अशी आहे जी रूग्णांना निसर्गाच्या जवळ ठेवते. मोठमोठ्या खिडक्या, मोठमोठे रूम यामुळे 20 ते 30 टक्के जास्त हवा येते. यामुळे हॉस्पिटलमध्ये एसी आणि कूलरचा देखील कमी वापर होतो.

हॉस्पिटलच्या छतावर गार्डन देखील बनवण्यात आले आहे. यामध्ये 200 प्रजातींच्या विविध वनस्पती आहेत. यामध्ये 100 मध्यम उंचीची झाडे आहेत. 50 भाज्यांची आणि 50 औषधी झाडे आहेत. याची काळजी हॉस्पिटल्सचे वॉलिंटियर्सच करतात.

स्टिफन किशनने सांगितले की, हॉस्पिटल रूग्णांच्या फिडबँक प्रती जागृक असते. हॉस्पिटलने डिजाईनसाठी अनेक पुरस्कार जिंकले आहेत. ज्यामध्ये इंटरनेशनल फ्यूचर लिविंग इंस्टीट्यूट आणि बायोफिलिक डिजाइन अँवार्डचा समावेश आहे.

Leave a Comment