बापरे ! भारतात तयार होणारे पॅकेजिंग फूड सर्वात हलक्या दर्जाचे


तुम्हाला जर बॉटलबंद पेय आणि पँकिंग केलेल्या वस्तू खाण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. एका सर्वेक्षणामध्ये समोर आले आहे की, जगभरातील पँकेट बंद अन्न आणि पेयच्या बाबतीत भारताची स्थिती सर्वाधिक खराब आहे. भारतातील पॅकिंग केलेले खाद्य आरोग्याला धोकादायक आहे.  12 देशांच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये भारत सर्वात खालच्या स्थानावर आहे.

भारतातील खाद्य पदार्थांमध्ये ट्रांस फॅट, मीठ आणि साखरेचे प्रमाण सर्वाधिक असते.हा परिणाम 12 देशांमधील 4 लाख खाद्य पदार्थांचे विश्लेषण केल्यानंतर समोर आला आहे. सर्वेमध्ये प्रामुख्याने साखर, सॅच्युरेटेड फॅट, मीठ आणि कँलेरीच्या मात्रेवर लक्ष्य देण्यात आले होते.

पहिल्या स्थानावर ब्रिटन असून, त्यानंतर अनुक्रमे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया आहे. चीन आणि भारत या यादीत सर्वात शेवटी आहे.

भारतात 100 ग्राम खाद्य पदार्थामध्ये साखरेचे प्रमाण हे 7.3 ग्राम आहे. तसेच सर्वेक्षणानुसार, भारतातील पॅकेजिंग पदार्थ हे अधिक उर्जा प्रदान करतात.

रिपोर्टनुसार, ही चिंतेची बाब आहे की, अधिक उत्पन्न असणाऱ्या देशाच्या तुलनेत कमी उत्पन्न असणाऱ्या चीन आणि भारतातील पॅकेजिंग फूडमुळे धोका निर्माण होत आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment