विश्व विक्रम करण्यासाठी या माणसाने केले चक्क हे कृत्य

ऑस्ट्रियाचा एक खेळाडू जोसेफ कोएबर्लने शनिवारी दोन तास, 8 मिनिट आणि 47 सेंकद बर्फाच्या बॉक्समध्ये बसत विश्व विक्रम केला आहे. यावेळी त्याने केवळ स्विम सूट घातला होता. जोसेफच्या आधी 2010 मध्ये हा विक्रम चीनी खेळाडू जिन सोंगहाओच्या नावावर होता. त्याने 53 मिनिट, 10 सेंकद बर्फामध्ये बसत हा विक्रम केला होता.

जोसेफने विक्रम करण्यासाठी विएनाच्या मेन स्टेशन निवडले होते. येथे तो बर्फाने भरलेल्या पारदर्शी बॉक्समध्ये बसला. त्याच्या खांद्यापर्यंत आईस क्यूब ठेवण्यात आल्या होत्या.

या दोन तासांच्या दरम्यान डॉक्टरांनी त्याचे बॉडी टेंप्रेचर चेक केले आणि पुर्ण विक्रम झाल्यावर त्याची संपुर्ण बॉडी चेक करण्यात आली. विक्रम केल्यानंतर तो म्हणाला की, मला माहिती आहे की, मी  अजून काहीवेळ बर्फामध्ये बसू शकलो असतो. मात्र मला त्याची गरज नव्हती. त्यामुळे मी दोन तासानंतर बाहेर आलो. आता मी माझा विक्रम तुटेपर्यंत वाट बघेल.

जोसेफ विक्रम बनवून खूप आनंदी आहे. मात्र तेथे आलेल्या अनेकांना ते आवडले नाही. तेथे आलेला एक युवक म्हणाला की, हा वेडेपणा आहे. कोणी वेडा किंवा बावळटच असेल जो विक्रम करण्यासाठी दोन तास बर्फाच्या बॉक्समध्ये बसेल. जोसेफची ही बर्फाच्या बॉक्समध्ये बसण्याची पहिलीच वेळ नाही. याआधी देखील एका टिव्ही शोमध्ये एका चँलेजसाठी एक तास बर्फाच्या बॉक्समध्ये बसला होता. ते चँलेज यशस्वी झाल्यानंतरच त्याला विश्व विक्रम बनवण्याची प्रेरणा मिळाली.

Leave a Comment