अ‍ॅमेझॉनच्या जंगलाबद्दल जाणून घ्या काही रोचक माहिती


जगभरात अनेक अशी जंगल आहेत जी, अत्यंत सुंदर आणि रहस्यमयी आहेत. ब्राजीलमध्ये जगातील सर्वात मोठे जंगल आहे. मात्र मागील दोन आठवड्यांपासून या जंगलात भयंकर आग लागलेली आहे. या आगीचे प्रमाण एवढे मोठे आहे की, यामुळे ब्राजीलच्या अनेक शहरात अंधारात पसरला आहे.

ट्विटरवर #PrayforAmazonas ट्रेंडिग करत आहे. लोक हे जंगल वाचवण्यासाठी ब्राजील सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडे अपील करत आहेत. संपुर्ण जगभरातील लोक या आगीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत.

या जंगलाचे नाव अ‍ॅमेझॉन असून, याला पृथ्वीचे फुफ्फुस म्हणून देखील ओळखले जाते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, जगातील 20 टक्के ऑक्सिजन हा या जंगलातून मिळतो. हे जंगल 70 लाख वर्ग मीटर म्हणजे 1.7 अब्ज एकरामध्ये पसरलेले आहे.

हे जंगल एवढे विशाल आहे की, या जंगलाच्या सीमा 9 देशांना जोडलेल्या आहेत. येथे दिवसा अंधार पसरलेला असतो. याच कारणामुळे हे जंगल अतिशय भितीदायक दिसते.  जर या जंगलात कोणी हरवले तर त्याव्यक्तीचे परत येणे अशक्य आहे.

अ‍ॅमेझॉनच्या जंगलात 16 हजार पेक्षा अधिक प्रजातींची झाडे आहेत. जवळपास 40 हजार करोड झाडं अ‍ॅमेझॉनच्या जंगलात आहे. येथे 25 लाखांपेक्षा अधिक प्रजातींचे किडे पाहायला मिळतात. इतर कोठेही न सापडणारे अनेक रहस्मयी आणि खतरनाक प्राणी देखील येथे पाहायला मिळतात.

येथील नदीत एनाकोंडापासून ते पिरान्हा मासा आणि वीज निर्माण करणारा मासा देखील सापडतो. याचबरोबर येथील जंगलात विचित्र प्रजातींची वटवाघळं देखील सापडतात.

सांगण्यात येते की, पृथ्वीवर अ‍ॅमेझॉन जंगल जवळपास 550 लाख वर्षांपासून आहे. येथे जगभरातील 10 टक्के अधिक जीव-जंतू आणि 200 पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतात.

अ‍ॅमेझॉनच्या जंगलात 500 पेक्षा अधिक आदिवासी प्रजाती राहतात. यामध्ये 50 टक्के प्रजाती अशी आहे, ज्यांनी अद्याप बाहेरचे जग बघितलेले नाही.

Leave a Comment