चक्क… या मंदिरात रोबोट बनला पुजारी


सर्वसाधारण सर्वच मंदिरात पुरूष हे पुजारी असतात. काही मोजक्याच ठिकाणी महिला पुजारी म्हणून काम करतात. मात्र तुम्ही कधी रोबोटला पुजाऱ्याचे काम करताना बघितले आहे का ? नाही ना ? मात्र जापानमध्ये 400 वर्ष जुन्या बौध्द मंदिरात पुजारी म्हणून रोबोटची नियुक्ती करण्यात आली आहे.

या रोबोटचे नाव अँड्राइड कँनन आहे. या रोबोटला क्योटोच्या कोदाइजी मंदिरात ठेवण्यात आले आहे. हा रोबोट मंदिरात हात जोडून प्रार्थना करतो आणि येणाऱ्या भाविकांना श्रध्दा आणि दयेविषयी माहिती देतो. तर अन्य पुजारी या रोबोटला साह्यता करतात.

मंदिराचे पुजारे टेन्शो गोटो म्हणाले की, हा रोबोट कधीच मरणार नाही. वेळेनुसार तो स्वतःला आणखी विकसित करेल. हेच या रोबोटचे वैशिष्ट आहे. रोबोटकडून आशा आहे की, त्याने बदलत्या बौध्द धर्मानुसार ज्ञानात वाढ करावी. जेणेकरून लोकांच्या अडचणी दूर करण्यास मदत होईल.

हा रोबोट पूजारी सहा फूट उंच आहे. त्याचे हात, चेहरा, खांदे हुबेहुब मनुष्याच्या त्वचेसारखे दिसतात. मात्र बघितल्यावर रोबोट असल्याचे लक्षात येते.या रोबोटला बनवण्याठी 10 लाख रूपये खर्च आला आहे.

याला ओसाका युनिवर्सिटीचे प्रोफेसर आणि जेन मंदिराने मिळून बनवले आहे. हा रोबोट लोकांना अंहकार आणि क्रोध यामुळे होणाऱ्या वाईट परिणांमाबद्दल सांगतो.

Leave a Comment