ही आहे पृथ्वीवरील सर्वात लांब पर्वतरांग


आपण ज्या पृथ्वीवर राहतो तिला अनेक उंच पर्वत, नद्या, झरे, दऱ्या यांनी नटविले आहे. निसर्गाची ही अमोल देणगी आहे. अनेकांना हे माहित नसेल की पृथ्वीवरील मोठ्या १५ पर्वतरांगांची एकूण लांबी ३५२०० किमी असून पृथ्वीच्या परिघाच्या ती फक्त ५ हजार किमीने कमी आहे. पृथ्वीवरील सर्वाधिक लांबीची पर्वतरांग आहे अँडिज. तिची लांबी ७ हजार किमी असून ही पर्वत रांग ७ देशांना जोडणारी आहे.

पृथ्वीवरच्या या १५ महत्वाच्या पर्वतरांगा एकूण ३७ देश जोडतात. येथील सर्वात छोटी पर्वतरांग ३०० किमीची असून तिचे नाव आहे पामेर. येथील दोन नंबरची पर्वतरांग आहे रॉकीज. ती ४८०० किमीची असून कॅनडा आणि अमेरिका या देशांना जोडते. तीन नंबरवर आहे ग्रेट डिव्हायडिंग रेंज. ही ३५०० किमीची पर्वतरांग फक्त ऑस्ट्रेलियात आहे. चार नंबरची ट्रान्स अंटार्टीका रेंजही ३५०० किमी आहे.


या यादीत पाच नंबरवर आहे ३००० किमी लांबीची कूनलुन पर्वतरांग. ती चीन मध्ये आहे. सहा नंबरवर युराल पर्वतरांग असून ती २५०० किमी आहे. ती रशिया आणि कझाकिस्तान मध्ये आहे. सात नंबरवर अॅटलास पर्वत रांग असून २५०० किमी लांबीची ही रांग तीन देश जोडते. आठ नंबरवर आहे हिमालय पर्वतमाला. ही २४०० किमीची असून भारत, पाकिस्तान, चीन, नेपाल आणि भूतान देश जोडते. नऊ नंबरवर तिचेनशान ही १३०० किमीची तीन देश जोडणारी पर्वतरांग आहे तर १० नंबरवर आहे आल्प्स. ही आठ देश जोडते.

या यादीत ११ नंबरवर ११०० किमी लांबीची कॉकेशस पर्वतरांग असून ती चार देश जोडते तर १२ नंबरवर असलेली हिंदुकुश ९५० किमीची असून चार देश जोडते. १३ नंबरवरची अलास्का ६५० किमी लांबीची आहे पण ती जगातील सर्वात प्रसिद्ध धोकादायक पर्वतरांग आहे. १४ नंबरवर काराकोरम ही ५०० किमी लांबीची पर्वतरांग भारत, चीन आणि पाकिस्तान देश जोडते. १५ नंबरची पामेर ही फक्त ३०० किमी लांबीची पर्वतरांग आहे.

Leave a Comment