त्रिदोष आणि त्रिगुणाचे प्रतिक आहे शिवाचे त्रिशूळ


श्रावण महिना सुरु असल्याने देशभर महादेवाची पूजा, अर्चना आणि उपासना सुरु आहे. या काळात अनेक मंदिरातून महादेवाचा खास शृंगार केला जातो. महादेव म्हटले कि जटेतून वाहणारी गंगा, माथ्यावरील चंद्रकोर, गळ्यात आणि हातात असलेले नाग, हातात गळ्यात रुद्राक्ष माला, हातात लहान मोठी कडी, डमरू आणि त्रिशूळ हे हवेच. त्याशिवाय शिवाच्या रुपाला पूर्णत्व येत नाही. अगदी शिवलिंग असेल तरी तेथे त्रिशूल असतो. त्रिशूळाशिवाय शिव ही कल्पना कुणीच करू शकत नाही.

काय आहे या त्रिशूळाचा अर्थ ? असे म्हटले जाते कि त्रिशूळचे तीन फाळ हे सत्गुण, रजोगुण आणि तमोगुणाचे प्रतिक आहे. चारवेदात समाविष्ट असलेल्या आयुर्वेदात त्रिशूळ हे माणसात असलेल्या कफ, पित्त आणि वात या त्रिदोषांचे प्रतिक मानले जाते. शिवाची उपासना करणाऱ्याना यामुळेच त्रिदोषाचा नाश आणि त्रिगुण लाभ मिळतो. त्रिशूळ पूजा केली तरी शिवपूजेचे पुण्य मिळते अशी भावना आहे.

शिव कैलास पर्वतावर निवास करतात असे मानले जाते. या ठिकाणी येणारे हिसक प्राणी शिव या त्रिशुळाने मारतात तसेच पर्वत चढताना त्रिशूल रोवून चढतात असे सांगितले जाते. त्रिशूळ शंकराचे मुख्य शस्त्र आहे आणि याच शस्त्राच्या सहाय्याने त्यांनी अनेक असुरांना ठार केले आहे. त्रिशूळ दान केले तर माणसाच्या आयुष्यातील कष्ट आणि क्लेश संपतात असाही विश्वास आहे. शंकराच्या हातातील डमरू हे त्याच्या अस्तित्वाची जाणीव देणारे वाद्य आहे असे मानले जाते.

Leave a Comment