ऐकावे ते विचित्रच


जगात अनेक अश्या गोष्टी आहेत ज्या ऐकून नवल करावे का आश्चर्यात पडावे असा प्रश्न पडतो. सगळ्याच गोष्टी काही आपल्याला माहित नसतात. पण त्या समजून घेऊन आपल्या ज्ञानात भर पडायला काय हरकत? अश्याच काही विचित्र बाबींची माहिती माझा पेपरचा वाचकांसाठी


जगात अनेक देश आहेत, बहुतेक देशांचे स्वतःचे राष्ट्रगीत आहे. स्पेन हा देश त्याला अपवाद नाही. मात्र त्यांच्या राष्ट्रगीतात शब्द नाहीत. म्हणजे राष्ट्रगीताचे लिरिक आहे पण हे गीत वाद्यावर वाजविले जाते, म्हटले जात नाही. आता पहा लिसन या शब्दाचे स्पेलिंग listen असे होते. याचा अर्थ ऐक असा आहे. पण हीच अक्षरे असलेला दुसरा शब्द आहे सायलेंट. त्याचे स्पेलिंग आहे silent आणि अर्थ आहे शांतता.

कोणाचाही मृत्यू होणे हे वाईटच. पण माणूस मृत्यू पावला कि बाकी हालचाली बंद झाल्या तरी त्याच्या अंगावर शहारा येऊ शकतो तसेच त्याची ऐकण्याची क्षमता कायम असते असे म्हणतात. आपण बरेचदा एखाद्याची शपथ घेतो. शपथ घेणे हे एखाद्या पेनकिलर घेण्यासारखे असते. कारण शपथ घेण्याच्या कृतीमुळे एन्डोमार्फिन हार्मोन रिलीज होते. हे हार्मोन वेदना कमी करणारे आहे. बहिरे लोक स्वप्नात सुद्धा साईन लँग्वेज मध्येच बोलतात. आपल्या आयुष्यातील सहा वर्षांचा काळ फक्त स्वप्ने बघण्यात जातो.


एखाद्याने प्रचंड प्रमाणात गाजरे खाल्ली तर त्याचा रंग नारिंगी होऊ शकतो. आरश्याला धडकून दरवर्षी १ अब्ज पक्षी मरतात. जपानवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर तेथे कान नसलेले ससे जन्माला आले होते. जगात रोज १८ अब्ज सिगारेटी ओढल्या जातात. अमेरिकेत रोज दोन कोटी कोंबड्या फस्त केल्या जातात. अर्धा किलो लोणी बनविण्यासाठी ३० कप दुध वापरावे लागते.

आपल्या आयुष्यात १२/१२/१२ ही अशी शेवटची तारीख आहे ज्यात दिवस, महिना आणि वर्ष एकच आहे. नवल वाटेल पण पृथ्वीवर १ अब्ज टन वजन होईल इतक्या मुंग्या आहेत.

Leave a Comment