अॅक्वाइन थेरपी – घोडे असतात माणसांचे डॉक्टर


जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्याला ताणतणाव असतात त्यात माणसाला जरा जास्तीच असतात. आयुष्य वेगवान झाल्याने स्पर्धा, अपुरी झोप, असह्य धावपळ यामुळे अनेकांना मानसिक त्रास होतो आणि मग डॉक्टरकडे जाणे आलेच. पण आता डॉक्टर नको आणि या व्याधीही नकोत असे एक नवे उपचार तंत्र संशोधकांनी विकसित केले आहे. त्याचे नाव आहे अॅक्वाइन थेरपी. यात पाळीव जनावरे आणि त्यातही प्रामुख्याने घोडे माणसांवर उपचार करतात.

या उपचाराची पद्धती अशी कि मानसिक अथवा अन्य काही व्याधींनी त्रस्त झालेल्या रुग्णांनी घोड्यांची सेवा करायची. म्हणजे त्याला खाऊ घालायचे, खरारा करायचा, अंघोळ घालायची आणि बाकीची आवश्यक ती देखभाल करायची. त्यामुळे मानसिक बदल होतात, ताण कमी होतात. संशोधकांना असे आढळून आले आहे कि ज्या घरात कुत्री मांजरे असे पाळीव प्राणी पाळले जातात त्या घरातील माणसे अधिक रीलॅक्स आयुष्य जगतात पण घोडे माणसाची वर्तणूक ओळखून त्याप्रमाणे प्रतिक्रिया देण्यात अधिक मदतगार ठरतात.

या पद्धतीचे उपचार घेणाऱ्यात अपंगत्व असलेले, मानसिक रुग्ण, वृद्धावस्थेतून आलेली निराशा, निद्रानाश, भूक न लागणारे, तणावाखाली राहणारे अश्यांना खूप फायदा होतो. या थेरपीमुले तणाव दूर होण्यास, आत्मविश्वास वाढण्यास, निर्णय क्षमता वाढण्यास, जबाबदारी उचलण्याची भावना वाढण्यास मदत होते आणि रुग्णाची जीवनाकडे पाहण्यची सकारात्मकता बनते..

भारतात पुण्याजवळ या पद्धतीची कार्यशाळा वडगाव येथे फजलानी नेचर्स नेस्ट कडून घेतली जाते. परदेशात या प्रकारचे उपचार आता खूपच लोकप्रिय ठरले आहेत. त्यापाठोपाठ भारतातही ते रुळत आहेत असे सांगितले जात आहे.

Leave a Comment