ब्रिटनचा विंडसर राजमहाल भूतांचे निवासस्थान

ब्रिटनच्या विंडसर राजमहालात राजघराण्यातील व्यक्तींची किमान २५ भुते वास्तव्य करून आहेत असा दावा केला जातो. खुद्द महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्याला दुजोरा दिला आहे. महाराणीने या संदर्भातला त्यांचा एक अनुभव शेअर केला आहे. त्यानुसार एक रात्री त्या आणि राजकुमारी मार्गारेट यांनी या महालातील लायब्ररीजवळ महाराणी एलिझाबेथ प्रथम यांचे भूत पहिले होते आणि त्या दोघी प्रचंड घाबरल्या होत्या.

या महालात राजे राण्यांची अनेक भुते पहिली गेल्याचे दावे केले जातात आणि ही संख्या किमान २५ असावी असेही म्हटले जाते. माजी राजे राण्यांची ही भुते महालाच्या भिंतीत राहतात असेही सांगितले जाते. ट्रॅव्हल वेबसाईट ‘व्हिजीट लंडन’ नुसार महाराणी आणि राजकुमारी मार्गारेट यांनी भूत दिसल्याचा दावा केला होता त्या अगोदर सुद्धा येथे पावलांचे आवाज ऐकू येत असत. या विषयावर पुस्तक लिहिणाऱ्या रिचर्ड जोन्स यांनी एका सुरक्षारक्षकाचा अनुभव शेअर केला आहे. हा रक्षकाने लायब्ररीजवळच्या खोलीत जॉर्ज द्वितीय यांचे भूत पहिले होते. जॉर्ज द्वितीय यांना वेडाचे झटके येत असत, म्हणून त्यांना या खोलीत बंद केले गेले होते.

जॉर्ज तृतीय यांचेही भूत पाहिल्याचे अनेक लोक सांगतात. मिडिया रिपोर्ट नुसार किंग जॉर्ज यांना ज्या खोलीत बंद केले होते तेथे त्यांचा मृत्यू झाल्यावर खिडकीतून बाहेर पाहताना त्यांना अनेकांनी पाहिले होते. आठव्या हेन्द्रीचे भूत सुद्धा अनेकांनी पाहिले होते मात्र नंतर ते गायब झाले होते. त्यांची पत्नी अॅना हिच्या रडण्याचा आवाज अनेक रात्री ऐकला गेला होता. तिची या महालात हत्या झाली होती.