व्हिडिओ व्हायरल; विराट कोहलीचा अनिल कपूरच्या गाण्यावर ‘झक्कास’ डान्स


टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत अफगाणिस्तान सामन्यादरम्यानचा विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकदा डान्स करताना भारतीय कर्णधार विराट कोहली दिसला आहे. अफगाणिस्तान भारत सामन्यादरम्यानही विराट कोहली थिरकला. अनिल कपूरच्या ‘माय नेम इज लखन’वर विराट कोहली डान्स करताना दिसला. त्याची डान्स स्टेप पाहताच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रीडाप्रेमींनी त्याचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. यापूर्वी विराट कोहलीने डान्सिंग रिअ‍ॅलिटी शो सुपर डान्सर चॅप्टर ४ मध्ये हजेरी लावली होती. तर अनुष्का शर्मासोबत रोमँटिक डान्स करताना दिसला आहे.


अफगाणिस्तानच्या फलंदाजीवेळी विराट कोहली सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी जात होता. तेव्हा ‘माय नेम इज लखन’ गाणे लागले होते. विराट कोहली हे गाणे ऐकताच स्वत:ला आवरू शकला नाही आणि नाचू लागला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. विराट कोहली यापूर्वी २०१६ टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान डान्स करताना दिसला होता. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही हाच अंदाज दिसला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा विराट कोहली मैदानात थिरकला.