टीव्ही शोमध्ये ‘तिने’ केला शेन वॉर्नच्या अश्लील कृत्याचा धक्कादायक खुलासा


यापूर्वी अनेकदा ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न वादात सापडला होता. कधी मद्यपान करून आणि ड्रग्ज घेऊन, तर कधी मुलींना घाणेरडे मेसेज पाठवल्याचा आरोप त्याच्यावर होता. आता शेन वॉर्नकडून आलेल्या त्या मेसेजबाबत टीव्ही शोमध्ये सहभागी झालेल्या जेसिका पॉवरने प्रतिक्रिया दिली आहे. वॉर्नला विक्षिप्त उपमा देत जेसिका म्हणाली, त्याने मला अश्लील मेसेज पाठवले होते.

जेसिका पॉवरने सांगितले, वॉर्नला मी प्रत्युत्तर दिले. तो तेव्हा एक्स-रेटेड झाला. त्यामुळेच वॉर्न बहुतेक वेळा अडचणीत येतो. वॉर्नला जेसिकाने वेडा म्हटले. तिने सांगितले, की तिला जेव्हा असे मेसेज आले, तेव्हा तिचा विश्वास बसत नव्हता, की ५२ वर्षीय माजी क्रिकेटपटू असे, कृत्य करू शकतो आणि असे घाणेरडे मेसेज तिला पाठवू शकतो. ती पुढे म्हणाली, हे आणखी विचित्र होते, की सलग दुसऱ्या आठवड्यात माझ्या इनबॉक्समध्ये शेन वॉर्नचे मेसेज आले होते. तो एक विक्षिप्त आहे. त्याने मला पाठवलेल्या काही गोष्टी योग्य नव्हत्या. मी त्याला क्वचितच उत्तर दिले. याच कारणांमुळे तो सतत अडचणीत येतो.