आयफोन १४ नव्या चिपसेट सह येणार?

अॅपल आयफोन १३ सिरीज लाँच होऊन अजून काही दिवसच लोटले असताना आयफोन १४ संदर्भातील बातम्या येऊ लागल्या आहेत. या फोनसंबंधी अनेक लिक्स आले असून फोनचे डिझाईन पूर्ण नवे असेल, हा सुपरसाईज बजेट फोन असेल आणि तो नव्या चीपसेट सह येईल असे अंदाज वर्तविले जात आहेत. हा फोन विवादास्पद पंचहोल सह असेल असेही म्हटले जात आहे. तर अन्य एका लिक मध्ये या फोनमधून कंपनी एक सरप्राईज ट्वीस्ट देईल असेही म्हटले गेले आहे.

टेकसाईट अँड सप्लायचेन एक्स्पर्ट डी जी स्ट्राईक नुसार या फोनच्या माध्यमातून ए १६ चिप ची एन्ट्री होऊ शकते. अॅपलची प्रायमरी चिप सप्लायर टीएसएमसी नवीन चिप आणेल आणि हे गेम चेन्गिंग अपग्रेड असेल असे सांगत आहेत. अॅपल ३ एनएम आधारित उपकरणे मोठ्या प्रमाणावर आणणारी पहिली कंपनी असेल असेही सांगितले जात आहे. ५ एनएमवरून ३ एनएम याचा अर्थ जादा स्पेस, जादा चिप लावण्याची सुविधा असा असून त्यामुळे फोनचा परफोर्मंस वाढणार आहे. शिवाय अशा फोन साठी विजेचा वापर कमी होईल आणि बॅटरी लाईफ वाढेल.. शिवाय कमी किमतीत हे फोन विकता येतील.

आयफोन १४ चे डिझाईन पूर्ण वेगळे असेल आणि त्यामुळे ग्राहकांना बऱ्याच वर्षानंतर काहीतरी नवीन मिळेल असाही अंदाज वर्तविला जात आहे.