आयपीएल २०२२, धोनीने सीएसके कडे व्यक्त केली ही इच्छा
आयपीएल २०२१ चा विजेता संघ, चेन्नई सुपरकिंग्सचा कप्तान महेंद्रसिंग धोनी याने त्याच्या फ्रेन्चाईजी कडे त्याच्यावर उगाच पैसे खर्च करू नयेत अशी इच्छा व्यक्त केली असल्याचे सांगितले जात आहे. धोनीने चेन्नई सुपर किंगने त्याला रीटेन करावे अशी त्याची इच्छा नसल्याचे व टीमने त्याच्यावर उगाच पैसे खर्च करू नयेत असे वाटत असल्याचे टीममालक एन श्रीनिवासन यांना सांगितल्याचे समजते. श्रीनिवासन यांनी त्याला दुजोरा देताना धोनी आम्हाला आमच्या टीम मध्ये हवाच आहे असे बोलून दाखविले आहे.
येत्या डिसेंबर जानेवारी मध्ये आयपीएल २०२२ साठी खेळाडूंचे लिलाव होणार आहेत. त्यात काही निवडक खेळाडू वगळता बाकीचे सर्व खेळाडू लिलावात सामील असतील. चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएल २०२१ खिताब जिंकला असून धोनीच्या नेतृत्वाखाली मिळविलेला हा त्यांचा चौथा विजय आहे. एडिटरजी ला दिलेल्या मुलाखतीत श्रीनिवासन यांनी धोनी अतिशय निष्पक्ष आहे आणि त्याला रीटेन करण्यासाठी टिमने जास्त पैसे खर्च करू नयेत असे सांगितल्याचे मान्य केले आहे.
यंदाच्या आयपीएल मध्ये चेन्नईसुपर किंग धोनीच्या नेतृत्वाखाली विजयी ठरली असली तरी धोनीची स्वतःची कामगिरी म्हणावी तशी झालेली नाही. त्याने १६ सामन्यात ११४ रन्स काढल्या असून त्याचा स्ट्राईक रेट १०७ वर आला आहे. आयपीएल २०२२ मध्ये आठ ऐवजी १० टीम खेळणार असून ६० ऐवजी ७४ सामने होणार आहेत. प्रत्येक टीम १४ सामने खेळणार आहे. यात दोन नव्या टीम सामील होणार असल्याने ५० नव्या खेळाडूना संधी मिळणार आहे.