जेव्हा जेव्हा भाजपचा पराभव होणार तेव्हा तेव्हा पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; नवाब मलिकांचा टोला


मुंबई – केंद्र सरकारने दिवाळीच्या पुर्वसंध्येला गेल्या वर्षभरापासून त्रस्त झालेल्या इंधन दरावाढीपासून काहीसा दिलासा दिला आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये तर डिझेलवरील शुल्कात दहा रुपयांची कपात करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. संपुर्ण देशभरात याची आजपासून अमंलबजावणी झाली आहे.

अनेकजण केंद्र सरकारच्या या निर्णयावर टीका करत आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील टीका म्हटले होते की, पोटनिवडणुकांमध्ये अपयश आल्याच्या भीतीने हा निर्णय घेण्यात आला. तर शिवसेने खासदार संजय राऊत यांनी देखील टीका करत म्हटले होते की, 50 रुपये कमी करायचे असेल तर भाजपचा संपुर्ण पराभव करावे लागेल. त्यानंतर आता राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जितक्या वेळा तुम्ही भाजपचा पराभव करणार तितक्या वेळा पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होतील, ही लूट थांबवायची असले तर भाजपला पराभूत करा, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे. मलिकांनी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्यासाठी जनतेला विनंती केली आहे की, भाजपचा पराभव करा जेणेकरून आणखी दर कमी होतील.

पोटनिवडणुकीतील पराभवामुळे पेट्रोलची किंमत 5 रुपये कमी झाली 50 रुपये कमी करायचे असतील कर भाजपचा संपुर्ण पराभव करावा लागेल, असे संजय राऊत म्हणाले. दिवाळी साजरी करण्यासारखे वातावरण नाही. महागाई खूप वाढली आहे, दिवाळी कशी साजरी करणार. लोकांना कर्ज काढून सण साजरे करावे लागत आहे, तरी देखील आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो, 2024 साली हे ही दिवस बदलतील. अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे. मोठे मन दाखवायला मन असायला पाहिजे, केंद्राने किमान 25 रुपये कमी करायला पाहिजे होते. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून बेहिशेबी पैसे सरकारने कमावले आहेत, असे देखील राऊत म्हणाले.