राहुल द्रविड च्या खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी, बनला मुख्य कोच

टी २० वर्ल्ड कपनंतर भारताचा माजी कप्तान आणि फलंदाज राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा कोच म्हणून जबाबदारी स्वीकारत असून त्या संदर्भातील घोषणा बीसीसीआयने ट्वीटवर केली आहे. रवी शास्त्री आता या पदावर राहणार नाही आणि टी २० नंतर विराट कोहली टीम इंडियाचे कप्तानपद सोडेल तेव्हा राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून काम सुरु करेल असे समजते.

रवी शास्त्री अजून मुख्य कोच पदावर असतानाच अचानक टी २० सामन्यांच्या मध्ये राहुल द्रविडची मुख्य कोच म्हणून केल्या गेलेल्या घोषणेमागे बीसीसीआय रवी शास्त्रीच्या खराब रेकॉर्डवर नाराज असल्याचे कारण आहे असे समजते. बीसीसीआयने राहुल द्रविडची मुख्य कोच पदी नियुक्ती सध्या वर्ल्ड कप २०२३ पर्यंत केली आहे. रवी शास्त्री यांनी मुख्य कोच पदाची जबाबदारी २०१७ मध्ये स्वीकारली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि जगातील क्रिकेट खेळणाऱ्या अनेक देशात टीम इंडियाची कामगिरी उत्तम झाली होती. पण या काळात भारत एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलेला नाही हे ही खरे. यामुळे शास्त्री आणि विराट कोहली यांच्यावर सतत टीका होत राहिली आहे.

शास्त्रीने वर्ल्ड कप नंतर बीसीसीआय बरोबरच करार न वाढविण्याचा निर्णय घेतला होता असेही सांगितले जात आहे. राहुल द्रविडला मुख्य कोच पदासाठी वर्षाला १० कोटी रुपये वेतन दिले जाणार आहे. त्याची जबाबदारी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होत असलेल्या न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया सिरीज पासून सुरु होणार आहे. या दोन देशात या काळात ३ टी २० आणि २ टेस्ट खेळल्या जाणार आहेत.