यंदा बाजारात इलेक्ट्रोनिक फटाक्यांची धूम

प्रदूषणात होणारी वाढ आणि दम्यासारख्या विकारांचा वाढणारा धोका लक्षात घेऊन देशात अनेक राज्यांनी दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांवर बंदी आणली आहे. परिणामी दिवाळी आणि फटाके यांचे अतूट नाते भंगणार काय या भीतीने फटाके प्रेमी नाराज आहेत. पण दिवाळीत उडविल्या जाणाऱ्या फटक्यांना एक मस्त पर्याय यंदा बाजारपेठेत उपलब्ध करून दिला गेला आहे. हा पर्याय आहे इलेक्ट्रोनिक फटाक्यांचा.

हे फटाके म्हणजे एक प्रकारचे क्विक लाईट आणि साउंड शो आहे. यातून खऱ्या फाटक्याप्रमाणेच प्रकाश आणि आवाज येतो. हे एकप्रकारचे स्मार्ट डिव्हाईस आहे आणि रिमोट कंट्रोलने नियंत्रित करता येते. त्यातून विविध प्रकारच्या फटाक्यांचे आवाज आणि त्याला अनुसरून प्रकाश बाहेर पडतो. पर्यावरण अनुकूल, वापरण्यास सहज सुलभ आणि प्रदूषण नाही हे त्याचे अन्य फायदे. दुसरा फायदा म्हणजे याचा वापर दीर्घकाळ करता येतो आणि ते फार महाग नाहीत.

या डिव्हाईस मध्ये स्मॉल पॉडस वायरच्या सहाय्याने जोडली गेली असून त्यात एलईडी बल्ब आहेत. वीज पुरवठा सुरु केला कि हाय व्होल्टेज तयार होते आणि ठराविक वेळेनंतर त्यातून प्रखर उजेड आणि आवाज येतो. अगदी ओरिजिनल फटाक्यानुसार हा आवाज आणि प्रकाश आहे. त्याचा उजेडसुद्धा तसाच पडतो. रिमोटच्या सहाय्याने सेटिंग बदलून विविध प्रकारच्या फटाक्यांचे आवाज आणि उजेड मिळविता येतो. त्यानुसार फटाका उजळण्याच्या वेळेत सुद्धा बदल होतो. यामुळे दिवाळीच्या फटाक्यांची उणीव नक्कीच भरून काढता येथे असे समजते.