काल दिवसभरात देशात 11 हजार 903 कोरोनाबाधितांची नोंद, तर 311 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव देशात अद्याप कायम आहे. देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला असला, तरी काल दिवसभरात 11 हजार 903 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 311 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकड्यात वाढ झाली असून देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा 4 लाख 59 हजार 191 वर पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 14 हजार 159 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाख 51 हजार 209 वर पोहोचली आहे. तर 252 दिवसांनी अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 36 लाख 97 हजार 740 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्याम महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत घट पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात राज्यात 1,078 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 095 बाधित कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 53 हजार 581 बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.59 टक्के झाला आहे. तर राज्यात काल दिवसभरात 48 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा डेथ रेट 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 3204 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सध्या 15 हजार 485 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,91,497 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 919 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 28 , 43, 792 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.