8 नोव्हेंबरपासून सुरु होणार अमेरिकेतील लहान मुलांचे लसीकरण


वॉशिंग्टन – कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका जगातील महासत्ता असणाऱ्या अमेरिकेला बसला आहे. पण सध्या अमेरिकेतील परिस्थिती हळूहळू पुर्वपदावर येत आहे. त्यातच आता अमेरिकेतील लहान मुलांची कोरोना प्रतिबंधक लसीची वाट पाहणाऱ्यांची प्रतिक्षा संपली आहे. अमेरिकेत लहान मुलांच्या लसीकरणाला 8 नोव्हेंबरपासून सुरुवात होता आहे. फायझर कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस अमेरिकेतील लहान मुलांना देण्यात येणार आहे. याबाबत बोलताना राष्ट्रपती जो बायडेन यांनी म्हटले की, हा आपल्यासाठी एक ‘टर्निंग पॉईंट’ आहे.

सेंटर्स फॉर डिजिटल कंट्रोल अँड प्रिवेंशनचा हवाला देत वृत्तसंस्था एएफपीने म्हटले आहे की, अमेरिकेतील 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीकरणाची सुरुवात करु शकतो. या निर्णयाचे अमेरिकेच्या सल्लागारांनी एकमताने समर्थन केल्यानंतर काही तासांनी ही घोषणा झाली. व्हाइट हाऊसच्या वतीने जारी करण्यात आलेल्या वक्तव्यानुसार, आज आपण कोरोनाविरोधात एका लढाईत महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचलो असल्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले आहेत.

राष्ट्रपती बायडन म्हणाले की, अमेरिकेत लहान मुलांसाठीच्या लसीची वाट पाहणाऱ्या पालकांचा प्रतिक्षा संपली असून अमेरिकेने घेतलेला हा निर्णय लहान मुलांद्वारे दुसऱ्यांपर्यंत व्हायरस पसरणाऱ्याची शक्यता कमी करतो. व्हायरसला हरवण्यासाठी आपली लाढाई आपल्या देशासाठी एक मोठे पाऊल आहे.