व्हॉट्सअ‍ॅपमध्ये दाखल झाली नवीन फिचर्स


आपल्यापैकी अनेकजण चॅटिंग, व्हिडीओ कॉल, स्टेटस इत्यादीसाठी व्हॉट्सअ‍ॅप फिचर्सचा वापर करतात. त्यामुळे युझर्स सातत्याने व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येणाऱ्या नव्या अपडेट्ची उत्सुकतेने वाट पाहात असतात. व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच नवे फिचर्स या अ‍ॅपमध्ये अपडेट केले आहेत. त्याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर डेस्कटॉप म्हणजे कॉम्प्युटरवर करत असताना जर तुम्हाला फोटो एडिट करायचा असेल, तर व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या मीडिया एडिटर नावाच्या फिचरचा वापर तुम्ही करू शकता. व्हॉट्सअ‍ॅप वेबद्वारे कॉम्प्युटरमध्ये तुम्ही या फिचरचा वापर करू शकता.

अनेक लोक चॅटिंग करताना स्टिकरचा वापर करतात. व्हॉट्सअ‍ॅपने वेगवेगळे स्टिकर शोधण्यासाठी Sticker Suggestions हे नवे फिचर आणले आहे. तुम्ही चॅटिंग दरम्यान एखादा मेसेज टाईप करून सर्च केला, तर तुम्हाला त्या संबंधित स्टिकर व्हॉट्सअ‍ॅप सुचवेल. व्हॉट्सअ‍ॅपचा असा दावा आहे की, Sticker Suggestions या फिचरला फीचर प्रायव्हसीकडे विशेष लक्ष देऊन बनवण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या लिंक प्रीव्ह्यू या नव्या फिचरद्वारे तुम्ही कुटुंबियांसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत वेगवेगळ्या कंटेंटच्या लिंक शेअर करू शकता. पेमेंट स्टिकर हे नवे फिचर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अपडेट करण्यात आले आहे. हे फिचर भारतातील पाच महिला कलाकारांच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. हे फिचर यूझरला मनी ट्रान्सफर संदर्भात मदत करेल.

व्हॉट्सअॅपच्या सर्व अपडेट्सकडे लक्ष देणारे WABetaInfo यांच्या मते, व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या एका बीटा व्हर्जनची टेस्टींग करत होते. या फिचरमध्ये प्रायव्हसी फिचर मिळणार आहे. रिपोर्टनुसार कंपनी व्हॉट्सअ‍ॅपवेबमध्ये मोबाईल अ‍ॅपचे लास्ट सिन, प्रोफाइल फोटो, इन्फो आणि Read Receipts हे फिचर्स अ‍ॅड करण्यात येणार आहे.