अखेर जागतिक आरोग्य संघटनेची कोव्हॅक्सिनला आपातकालीन वापरासाठी मंजुरी


नवी दिल्ली – WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आणि प्रतीक्षा सुरू असलेला निर्णय अखेर घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारतात निर्मिती होणाऱ्या कोव्हॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. भारतात कोव्हॅक्सिनचे डोस देण्यास याआधीच सुरूवात करण्यात आली आहे. याआधीच केंद्र सरकारने या लसीला मान्यता दिली आहे. पण, आंतरराष्ट्रीय स्तरावर कोव्हॅक्सिनचा वापर होण्यासाठी या लसीला डब्ल्यूएचओची मान्यता आवश्यक होती. या मान्यतेची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून सगळ्यांना लागली होती. अखेर ती मान्यतेवर डब्ल्यूएचओने शिक्कामोर्तब केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने यासाठी गेल्याच आठवड्यात भारत बायोटेककडून लसीविषयी अतिरिक्त माहिती मागवली होती. ही माहिती तपासून पाहिल्यानंतर डब्ल्यूएचओचे समाधान झाले आणि लसीच्या आपातकालीन वापरासाठी मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.