हुमा कुरैशीला दिली सोनाक्षीने लिगल नोटीस पाठवण्याची धमकी


बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशीला सोमवारी सोनाक्षी सिन्हाने ‘कायदेशीर नोटीस’ पाठवण्याची मजेशीर अंदाजात धमकी दिली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सोनाक्षीने एक पोस्ट शेअर केली होती. तिने या पोस्टमध्ये हुमाने शेअर केलेल्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. सध्या सोनाक्षीची ही पोस्ट चर्चेत आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हुमा कुरैशीने एक फोटो शेअर केला होता. हुमाचा चेहरा या फोटोमध्ये दिसत नाही कारण तिने चेहरा मास्कने झाकला आहे. तसेच तिचे केवळ डोळे दिसत आहेत. हुमाने काळ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. तिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. दरम्यान सोनाक्षीने हा फोटो शेअर करत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हुमाच्या या फोटोचा स्क्रीनशॉट काढून सोनाक्षीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘माझा फोटो माझ्या परवानगी शिवाय कसा शेअर केला आहेस? तेही तुझा आहे सांगत. तुला मी कायदेशीर नोटीस पाठवेन, या आशयाचे मजेशीर कॅप्शन दिले आहे. सध्या हुमाचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.