राज कुंद्राचा सोशल मीडियाला राम राम


गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा चर्चेत आहेत. पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला अटक झाली होती. त्यानंतर राजला दोन महिन्यांनंतर जामीनही मंजूर झाला होता. पण या संपूर्ण प्रकरणानंतर आता राज कुंद्राने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

राज कुंद्रा हा पॉर्नोग्राफी प्रकरणी तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर अद्याप समोर आलेला नाही. शिल्पा शेट्टी ही काही दिवसांपूर्वी मुलांसह अलिबागला रवाना होताना दिसली. पण तिच्यासोबत तिचा पती राज कुंद्रा उपस्थित नव्हता. या प्रकरणानंतर राज कुंद्रा हा अद्याप समोर आलेला नाही. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर त्याने सोशल मीडियावरुन एक्झिट घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

आपले इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंट राज कुंद्राने डिलीट केले आहे. शिल्पा शेट्टीप्रमाणे राज कुंद्राही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असायचा. तो सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. पण नेटकऱ्यांनी त्याला पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर फार ट्रोल केले होते. त्यामुळेच त्याने सोशल मीडिया अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला असावा, असे बोलले जात आहे.