महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीमध्ये केला सलमानच्या लग्नाबाबत मोठा खुलासा


बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या कुटुंबीयांपासून ते मित्रपरिवार आणि चाहते देखील भाईजानचे लग्न कधी होणार? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहात आहेत. सलमानचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. आता नुकताच सलमानचे जवळचे मित्र आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी त्याच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.

नुकतीच सिद्धार्थ कननला महेश मांजरेकर यांनी मुलाखत दिली. त्यांनी या मुलाखतीमध्ये, कधी कधी मी सलमानसोबत अनेक विषयांवर बोलतो. बऱ्याचदा इतर लोक बोलू शकणार नाहीत, त्या विषयावर देखील आमचे बोलणे होते. सलमानला मी म्हणालो होतो की तू लग्न करत नाहीस याचे मला फार वाईट वाटते. माझी इच्छा आहे की तू लग्न करावे. मला सलमानची मुले पाहायची आहेत. अनेकदा तो माझ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो. पण मला असे जाणवले की त्याला देखील कुणाची तरी गरज असल्याचे म्हटले.

महेश मांजरेकर पुढे म्हणाले, मला कधी कधी असे जाणवते की तो बाहेरुन जितका आनंदी दिसतो, तितकाच आतून एकटा आहे. तुम्हाला माहिती असेल सलमान जिथे राहतो, तो एक बेडरुम असलेला फ्लॅट आहे. जेव्हा मी त्याच्या घरी जातो, तेव्हा तो ड्रॉइंग रुममधील सोफ्यावर झोपलेला असतो. सलमान एक यशस्वी अभिनेता आहे. सलमानचे अनेक मित्रमैत्रीण आहेत. ते सलमावर खूप प्रेम करतात. पण सलमानला जिवापाड प्रेम करणारी कुणी तरी हवी.

आजवर सलमानचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. पण सलमान कधीही त्याच्या नात्यावर उघडपणे बोलला नाही. सध्या सलमान लुलिया वंतुरला डेट करत असल्याचे म्हटले जाते. पण त्याने अद्याप यावर वक्तव्य केले नाही. लुलिया सलमानच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.