अनिल देशमुखांना न्यायालयाने सुनावली चार दिवसांची ईडी कोठडी


मुंबई: चार दिवसांची ईडी कोठडी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुनावण्यात आल्यामुळे आता अनिल देशमुख यांची दिवाळी कोठडीत जाणार आहे. अनिल देशमुख यांना आज मंगळवारी, पहाटेच्या सुमारास 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली. ईडीने विशेष न्यायालयाकडे १४ दिवसांची कोठडी मागितली होती. पण, न्यायालयाने ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर रात्री 3 वाजेपर्यंत अनिल देशमुख हे त्यांचे वकील इंद्रपाल सिंग यांच्याशी चर्चा करत होते. रात्री 3 वाजताच्या दरम्यान वकील इंद्रपाल हे देखील ईडी कार्यालयामधून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी आपण या अटकेला न्यायालयात विरोध करणार असल्याची माहिती दिली होती. आज सकाळी 10 वाजता देशमुख यांना वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.