दिवाळी नंतर आर्यनला सोडावा लागणार ‘मन्नत’

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख आणि गौरी खान याचा लाडका आर्यन ड्रग केस मध्ये जामीन मिळून घरी म्हणजे मन्नतवर आला असला तरी दिवाळी नंतर आर्यनला मन्नत सोडवे लागणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. शाहरुख आणि गौरीने आर्यन संदर्भात काही ठोस निर्णय घेतले असून मन्नत मधून बाहेर काढणे हा त्याचाच एक भाग असल्याचे बॉलीवूड लाईफच्या रिपोर्ट मध्ये म्हटले गेले आहे.

शाहरुखला आर्यनच्या सुरक्षेची चिंता आहे. ड्रग प्रकरणात जामीन मिळाला असला तरी आर्यन आता त्याच्या मनाप्रमाणे वागू शकणार नाही. त्यामुळे दिवाळी नंतर आर्यनला मन्नत सोडून अलिबाग येथे पाठविले जाणार आहे. अलीबाग येथे शाहरुखचे फार्म हाउस आहे. तेथे आर्यनला राहावे लागेल. तो मेंटल ट्रॉमा मधून बाहेर यावा यासाठी हि योजना केली गेल्याचे सांगितले जात आहे. आर्यन जामिनावर सुटला असला तरी त्याचा पासपोर्ट जप्त केला गेला आहे आणि तो जोपर्यंत जामिनावर आहे तोपर्यत पासपोर्ट परत दिला जाणार नाही.

झाल्या प्रकाराचा शाहरुखला खूप त्रास झाला आहे आणि आर्यन साठी स्वतंत्र बॉडीगार्ड नेमला असता तर कदाचित हा प्रकार इतका वाढला नसता असा विचार शाहरुखच्या मनात आहे. त्यामुळे आर्यन साठी स्वतंत्र बॉडीगार्ड ठेवण्याचा निर्णय शाहरुखने घेतला आहे. शाहरुख आणि त्याच्या सर्व कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी रवी या बॉडीगार्ड वर आहे. रवीप्रमाणेच एखादा खात्रीचा बॉडीगार्ड असेल तर आर्यनच्या सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेऊ शकतो व त्यादृष्टीने शाहरुख विचार करतो आहे असेही समजते.