डिझायनर सब्यसाचीने अखेर ‘ती’ वादग्रस्त जाहिरात घेतली मागे


मंगळसूत्रावर प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी केलेली त्यांची वादग्रस्त जाहिरात मागे घेतली. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या जाहिरातीबाबत सब्यसाचीला इशारा दिला होता की, ही जाहिरात येत्या २४ तासात हटवली नाही, तर त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला जाईल. यावर मिश्रा यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनीही कठोर भूमिका घेतली. आता आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर माहिती देताना सब्यसाचीने सांगितले की ती जाहिरात काढून टाकली जात आहे.

याप्रकरणी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले होते की, डिझायनर मुखर्जी यांच्या मंगळसूत्राची जाहिरात अत्यंत आक्षेपार्ह आहे. दागिन्यांबाबत बोलायचे झाले तर धार्मिक दृष्टिकोनातून मंगळसूत्राला सर्वाधिक महत्त्व आहे. मंगळसूत्राचा पिवळा भाग माता पार्वती आणि काळा भाग भगवान शिव असल्याचे आपण मानतो. शिवाच्या कृपेने स्त्री आणि तिचा पती यांचे रक्षण होते. शिवाच्या कृपेने स्त्री आणि तिचा पती यांचे रक्षण होते. माँ पार्वतीच्या कृपेने वैवाहिक जीवन सुखी राहते. अशा परिस्थितीत अशा जाहिराती धार्मिक भावना दुखावणाऱ्या आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर इतर धर्मियांवर अशा जाहिराती दाखवा, असे ते म्हणाले.

नरोत्तम मिश्रा आणि हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केल्यानंतर सब्यसाचीने जाहिरात मागे घेतली. त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली, ज्यामध्ये त्याने लिहिले की, या जाहिरातीमुळे समाजातील एक घटक दुखावला गेल्याचे आम्हाला दुःख आहे, म्हणून आम्ही ही जाहिरात मागे घेत आहोत.