ओटीटी प्लॅटफॉर्म सोडण्याचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीचा मोठा निर्णय


सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा धंदा झाल्याचे मत आपल्या प्रभावी अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने व्यक्त केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म सोडण्याचा निर्णय घेतल असल्यामुळे यापुढे तो नेटफ्लिक्स, अमॅझॉन प्राईनसारख्या कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करताना दिसणार नाही. नवाजुद्दीनच्या चाहत्यांना हा मोठा धक्का आहे. यापूर्वी नवाजने सेक्रेड गेम, सीरियस मॅन सारख्या हिट वेबसीरिजमध्ये आपली वेगळी छाप सोडली होती. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने हा निर्णय जाहीर केला.

नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊससाठी ओटीटी प्लॅटफॉर्म धंदा झाला आहे. अनेक अनावश्यक शोसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म ‘डंपिंग ग्राऊंड’ बनले आहे. या ठिकाणी सध्या असे शो आहेत, जे एकतर पाहण्याच्या लायकीचे नाहीत किंवा कशाचे तरी सिक्वल आहेत, ज्यामध्ये नवे सांगण्यासारखे काहीच नाही. जेव्हा मी सेक्रेड गेमसाठी नेटफ्लिक्ससोबत काम करायला सुरुवात केली, तेव्हा खूप डिजीटल मीडियाविषयी खूप उत्सूकता आणि आव्हाने होती. नव्या लोकांना संधी दिली जात होती, पण त्याचा ताजेपणा निघून गेला आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म सध्या स्वतःला स्टार समजणाऱ्या अभिनेत्यांसाठी आणि मोठमोठ्या निर्मात्या कंपन्यांसाठी धंदा बनला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्व मोठ्या लोकांशी बॉलीवूडमधील प्रमुख चित्रपट निर्मात्यांनी फायद्याचे करार केले आहेत. निर्मात्यांना अमर्यादीत कंटेंट तयार करण्यासाठी प्रचंड मोठी रक्कम मिळते. पण, अमर्यादीत कंटेंटने गुणवत्तेला मारले असल्याचा आरोप आरोप नवाजुद्दीन सिद्दिकने केला.

नवाजुद्दीन पुढे म्हणाला, जर मला ओटीटी प्लॅटफॉर्मवरील शो पाहणेही शक्य होत नसेल, तर मी त्यात कसे काम करू? या स्टार व्यवस्थेने मोठ्या पडद्याला खाऊन टाकले. आता आमच्यासारखे तथाकथित ओटीटी स्टार मोठ्या पैशाची मागणी करतात आणि बॉलीवूड ए-लिस्टर्ससारखे ताशेरे ओढतात. कंटेंट हाच निर्णायक आहे, हे ते विसरले आहेत. स्टारचे राज्य असायचे, तो काळ आता निघून गेला आहे.

लॉकडाऊनच्या आणि डिजीटल मीडियाच्या प्रभावाआधी बॉलिवूडमधील ए लिस्टर त्यांचा चित्रपट देशभरातील ३,००० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करायचे आहेत. प्रेक्षकांना हे चित्रपट पाहण्याखेरीज कोणताच पर्याय उरायचा नाही. आता प्रेक्षकांना अनेक पर्याया खुले असल्याचेही नवाजने नमूद केले.