अंकिता लोखंडे डिसेंबर मध्ये होणार विवाहबद्ध

टीव्ही स्टार आणि बॉलीवूड मधील दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या बरोबर रिलेशनमुळे आणि सुशांतच्या मृत्युनंतर एकदम चर्चेत आलेली अंकिता लोखंडे अखेर तिचा दीर्घकाळाचा मित्र विक्की जैन सोबत या डिसेंबर मध्ये विवाहबद्ध होत असल्याचे समजते.मिळालेल्या माहितीनुसार हे लग्न डिसेंबरच्या १२ ते १४ तारखेदरम्यान होत आहे. या संदर्भात अंकिताने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अर्थात अंकिता इन्स्टास्टोरीवर ती आणि विक्कीचे अनेक व्हिडीओ नित्य नेमाने शेअर करते. त्यातील अनेक व्हिडीओ रोमँटिक पोझ मधले आहेत. अंकिता सोशल मिडीयावर नेहमी सक्रीय असते. करोनाचे सावट थोडे दूर झाल्यानंतर बॉलीवूड मधील अनेक स्टार बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाले असून त्यात रणबीर कपूर- आलीया भट्ट, राजकुमार राव-पत्रालेखा यांचा समावेश आहे. विक्की कौशल आणि कतरिना कैफ डिसेंबर मध्येच सात फेरे घेत असल्याच्या बातम्या आल्या आहेतच.