काल दिवसभरात देशात १४,३१३ कोरोनाबाधितांची नोंद; तर ५४९ रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतील चढ-उतार सुरूच असून शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत थोड्या प्रमाणात घट झाली आहे. काल दिवसभरात देशात १४,३१३ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. काल दिवसभरात देशात ५४९ करोनाबाधितांचा मृत्यु झाला आहे.

आरोग्य मंत्रालय नुकत्याच जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात शुक्रवारी १४,३१३ कोरोनाबाधिताची नोंद झाली आहे. तर ५४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल दिवसभरात १३,५४३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच सध्या देशात एक लाख,६१ हजार,५५५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

त्यानंतर देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या ३,३६,४१,१७५ झाली आहे. तर देशातील कोरोना लसीकरणाची संख्या आता १०५.४३ कोटींहून अधिक झाली आहे. काल दिवसभरात ५६.९१ लाखाहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९८.१९ टक्के आहे. देशातील सक्रिय प्रकरणे एकूण प्रकरणांपैकी एक टक्के (०.४७%) पेक्षा कमी आहेत. सध्या, देशातील पॉझिटिव्ही रेट १.१८ टक्के आहे, जो गेल्या सलग ३६ दिवसांपासून दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे.