राज ठाकरेंसह आई आणि बहीणची कोरोनावर मात


मुंबई – कोरोनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मात केली आहे. तसेच, राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदाताई व त्यांची बहीण या देखील कोरोनामुक्त झाल्या आहेत. राज ठाकरे यांच्या चाचणीचा अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती लीलावती रूग्णालयाचे डॉ. जलील पारकर यांनी दिली आहे.

२३ ऑक्टोबर रोजी राज ठाकरे यांना कोरोना संसर्ग झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते व त्यानंतर ते गृहविलगीकरणात होते. राज ठाकरे, त्यांच्या मातोश्री आणि त्यांच्या बहीणेने कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. पण, त्यानंतर देखील त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले होते.