डिझायनर सब्यसाचीला मंगळसूत्राच्या ‘त्या’ जाहिरातीमुळे कायदेशीर नोटीस


मुंबई – आपल्या नवीन मंगळसूत्र कलेक्शनमुळे प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. त्याने ज्या प्रकारच्या जाहिरातीचा अवलंब लग्नाच्या पवित्र बंधनाचे प्रतिक आणि लग्नाचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या मंगळसूत्राचे नवे कलेक्शन लॉंच करण्यासाठी केला आहे, त्यामुळे ते ट्रोल झाले आहे. आपल्या इंस्टाग्रामवर लेटेस्ट डिझाइन मंगळसूत्राचा फोटो सब्यसाचीने शेअर केला आहे. फॅशन डिझायनरच्या मॉडेलने डेनिम आणि ब्रा परिधान करून फोटो सेशन केले आहे, जे नेटकऱ्यांना आवडले नाहीत. आता यामुळे डिझायनर सब्यसाचीला कायदेशीर नोटीस धाडण्यात आली आहे.


त्यांना ही नोटीस वकील आशुतोष दुबे, कायदेशीर सल्लागार, भाजप-महाराष्ट्र (पालघर जिल्हा) यांनी पाठवली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटरवरून याबद्दल पोस्ट केली आहे. सब्यसाची मुखर्जी या भारतीय फॅशन डिझायनरला मंगळसूत्र पवित्र हिंदू विवाहाचा भाग असल्यामुळे मंगळसूत्र कलेक्शनच्या जाहिरातीसाठी अर्ध-नग्न मॉडेल वापरण्याबाबत मी कायदेशीर नोटीस बजावली आहे.

रॉयल बंगाल मंगळसूत्र इंटिमेट फाइन ज्वेलरी कलेक्शन सब्यसाचीच्या लक्झरी लेबलने लॉंच केले आहे. मंगळसूत्राची किंमत १ लाख ६५ हजार रुपयांपासून सुरू आहे. सब्यसाचीने आपल्या इंस्टाग्रामवर मंगळसूत्रची जाहिरात करत फोटो शेअर केले आणि ‘द रॉयल बंगाल मंगळसूत्र’ असे कॅप्शनमध्ये लिहिले. या जाहिरातीत एका महिलेने ब्रा आणि मंगळसूत्र घातले आहे, तर पुरुष मॉडेलही शर्टलेस आहे. मंगळसूत्र हा एक पवित्र दागिना मानला जातो, जो हिंदू स्त्रिया लग्नानंतर घालतात. लग्नाच्या वेळी वर आपल्या वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालून आपला जीवनसाथी बनवतो. पवित्र नाते दिसू नये म्हणून काळे मोतीही घातले जातात. पण सब्यसाचीने ज्या पद्धतीने ते सादर केले ते सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले आहे.