अशी आहे आनंद महिंद्रा यांची जीवनशैली

देशभरातील अनेक उद्योजकांनी अथक परिश्रम आणि कसून मेहनतीच्या जोरावर आपले उद्योग नावारूपाला आणले आहेत आणि त्यातील अनेक उद्योजक भारताच्या विकासात योगदान देण्यात सुद्धा पुढे आहेत. यातील एक नाव आहे ते महिंद्रा आणि महिंद्राचे अध्यक्ष आणि सीइओ आनंद महिंद्रा. आनंद यांच्या कामाची पद्धत अनेकांना भावते. सोशल मिडीयावर ते खूप सक्रीय आहेतच पण रोज काही ना काही हटके शेअर करत असतात. आनंद महिंद्रा होतकरू आणि इमानाने मेहनत करणाऱ्यांच्या मदतीला सदैव तयार असतात हे अनेकदा दिसून आले आहे.

देशातील या बड्या उद्योजकाची जीवनशैली कशी असेल हे जाणून घेणे मोठे रोचक आहे. सांगितले तर सहज कुणी विश्वास ठेवणार नाही पण आनंद महिंद्र स्वतःची कामे स्वतः करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे अनेकदा ते स्वतः चा नाश्ता स्वतः बनवितात. त्यांना नाष्ट्याला इडली खाणे आवडते. त्याचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत.

सोशल मिडीयाच्या माध्यमातून ते अनेक मुद्दे मांडतात, काही प्रेरणादायी व्हिडीओ शेअर करतात, होतकरुची माहिती मिळाली कि त्यांना सहकार्याचा हात पुढे करतात. त्यांचे फॅन फोलोइंग मोठे आहे. जगातली सर्वात महागडी कार घेण्याची ऐपत असूनही आनंद त्यांच्या कारखान्यात बनलेली कारच वापरतात. २०१५ पासून ते महिंद्रा टीयुव्हीचा वापर करत आहेत तसेच त्यांच्या ताफ्यात टीयुव्ही ३०० प्लस, स्कोर्पियो व अल्तुरस्ट जी ४ या कार आहेत.

ट्वीटरवर त्यांचे ७७ लाख फॉलोअर्स आहेत. मुंबईतील नेपियन सी रोडवर आजोबांच्या घरात ते राहतात. या इमारतीत त्यांचे आजोबा भाडेकरू होते. या घराची पुन्हा बांधकाम करायचे ठरले तेव्हा बिल्डरने त्यांना घर रिकामे करण्यास सांगितले होते. तेव्हा गुलिस्तान नावाचा हा बंगला आनंद यांनी २७० कोटींना विकत घेतला. १३ हजार चौरस फुटाच्या या बंगल्यात आनंद त्यांची पत्नी अनुराधा आणि दोन कन्या यांच्याबरोबर आजही वास्तव्य करत आहेत. अनेकांनी नोटीस केले असेल कि आनंद घड्याळ वापरत नाहीत. डिझायनर घड्याळे किंवा अत्यंत महागडी घड्याळे त्यांना आवडतात पण ती फारच महाग असतात म्हणून विकत घेत नाही असा खुलासा त्यांनीच केला आहे.

इतकेच काय पण कोविड १९ साथीत वर्क फ्रॉम होम कल्चर मध्ये सुद्धा एका व्हीडीओ कॉलची पोस्ट त्यांनी शेअर केली होती. आणि त्यात मी घरात असतो तेव्हा लुंगीच घालणे आवडते असेही सांगितले होते. आनंद यांनी फिल्म मेकिंग आणि वास्तूरचनाकारचे शिक्षण घेतले आहेच पण त्याचबरोबर हॉवर्ड, केम्ब्रिज मधून व्यवस्थापन पदवी सुद्धा घेतलेली आहे. त्यांना तमिळ भाषा येते. १९४५ साली सुरु झालेल्या महिंद्रा कंपनीची आजची उलाढाल प्रचंड असून आनंद यांची संपत्ती दोन अब्ज डॉलर्स आहे असे आकडेवारी सांगते.