रिब्रांड झालेल्या या कंपन्यांनी व्यवसायात मिळविले मोठे यश
सोशल मिडिया क्षेत्रातील फेसबुक आता मेटा नावाने ओळखली जाणार असल्याचे जाहीर झाले आहे. पण फेसबुक अश्या प्रकारे रिब्रांड केलेली पहिली कंपनी नाही. यापूर्वी सुद्धा अनेक कंपन्यांनी त्यांची पहिली नावे बदलून नवीन नावाने व्यवसाय सुरु केले आणि त्यातील काही कंपन्या तर नाव बदलल्यावर चांगल्याच प्रसिद्घ झाल्या. त्यातील काही कंपन्यांची माहिती अशी
आज जगाचे सर्च इंजिन अशी ओळख असलेल्या गुगलचे पहिले नाव होते बॅकरब. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी लिंक बॅक अॅस्पेक्टवर फोकस करून सुरु केलेली ही कंपनी गुगल बनली आणि आज जगातील अत्यंत यशस्वी कंपन्यांमध्ये तिचा समावेश आहे. तीच कथा इन्स्टाग्रामची. दररोज कोट्यावधी युजर्स कडून फोटो, व्हिडीओ शेअर होणारी हि कंपनी सुरु झाली ती बर्बन नावाने. ओडीऑ नावाने सुरु झालेल्या कंपनीचे रिब्रांडिंग ट्वीटर नावाने केले गेले आणि पाहता पाहता तिची लोकप्रियता इतकी प्रचंड वाढली आहे कि जगभरातील नेते, सेलेब्रिटी सतत काही ना काही ट्वीट करून आपले म्हणजे जगासमोर मांडताना दिसत आहेत. सोशल मिडिया इतिहासात ही कंपनी लीजंटरी बिझिनेस रिब्रांड म्हणून ओळखली जाते.
रेलेंटलेस हे नाव आज अनेकांना आठवत नसेल. ऑनलाईन बुक स्टोर म्हणून सुरु झालेला हा प्लॅटफॉर्म. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मध्ये सामील असलेल्या जेफ बेजोस यांची ही कंपनी आता अमेझोन नावाने रिब्रांड केली गेली आणि आज जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी म्हणून तिची ओळख आहे. मनी ट्रान्स्फर क्षेत्रातील पे पाल सुरु झाली ती कंफीनिटी नावाने. नंतर एलोन मस्क यांच्या ऑनलाईन कंपनी एक्स डॉट कॉम मध्ये विलीनीकरण झाल्यावर ती पे पाल बनली.
फूड डिरेक्टरी म्हणून सुरु केली गेलेली फुडीबे ने दोन वर्षे चांगला व्यवसाय केल्यावर २०१० मध्न्ये रिब्रांड होऊन आता झोमॅटो म्हणून प्रसिद्ध झाली आहे. तर गुरुग्राम येथे २०२० जानेवारी मध्ये होम सर्व्हिस मार्केट प्लेस अर्बन क्लॅप नावाने सुरु झालेली कंपनी आता अर्बन कंपनी नावाने रिब्रांड केली गेली आहे आणि जागतिक मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या भारत, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि युएइ मध्ये तिचा विस्तार झाला आहे.