नवाब मलिकांच्या आरोपांनंतर क्रांती रेडकर संतापली; म्हणाली…


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर टीकास्त्र सुरू ठेवले आहे. समीर वानखेडे यांनी कॉर्डेलिया क्रूझवर टाकलेल्या छाप्यापासून थेट समीर वानखेडेंच्या धर्मापर्यंत अनेक बाबींवर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. आज देखील नवाब मलिक यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन काशिफ खान यांना समीर वानखेडेंनी मुद्दाम अटक केली नसल्याचा दावा केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने ट्विटरववरून सूचक प्रतिक्रिया देत निशाणा साधला आहे.


आपल्या ट्विटमध्ये क्रांती रेडकरने कुणाचेही नाव न घेता अप्रत्यक्षपणे नवाब मलिक यांच्यावरच निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. रोज माध्यमांवर केलेल्या कुणाच्यातरी निरर्थक विधानांवर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. माझ्याकडे इतरही अनेक महत्त्वाची कामे करण्यासाठी आहेत. आता येथून पुढे मी फक्त कायदेशीर पद्धतीनेच व्यक्त होईन. माझा फक्त भारताच्या राज्यघटनेवर विश्वास असल्याचे क्रांती म्हणाली.