आर्यन खानच्या जामिनात जुही चावलाची मुख्य भूमिका


मुंबई – १ लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यासह १४ अटींवर प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. आज (२९ ऑक्टोबर) याबाबत सविस्तर निकालपत्र मुंबई उच्च न्यायालयाने दिले. न्यायालयाने जामीन देण्याचा निर्णय गुरुवारी (२८ ऑक्टोबर) दिला होता. त्यामुळे आता आज आर्यन खानसह तिघेही तुरूंगाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आर्यन खानच्या जामीन प्रक्रियेत अभिनेत्री जुही चावला महत्वाची भूमिका निभावणार आहे.

काही कायदेशीर प्रक्रिया आर्यन खानच्या जामिनानंतर पुर्ण करायच्या आहेत. जुही चावला यासाठी मुंबई सत्र न्यायालयात पोहचली आहे. जुही चावला आर्यनच्या जामिनासाठी जामिनदार असणार आहे. न्यायालयाने ज्या अटी शर्थी घातल्या आहेत. त्या अटीनुसार आर्यनला जामिनदाराची गरज भासणार आहे. त्यासाठी जुही चावला न्यायालयात पोहचली आहे. ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर आर्यन खानचा तुरूंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.