चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेनंतर जयंत पाटलांचा पलटवार


मुंबई – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी हा कधीच भरवशाचा पक्ष नाही. सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी एक राजकारण करतात. एकवेळ काँग्रेस परवडली. काँग्रेसमधील सगळी व्यक्तिमत्वे सुसंस्कृत असतात, ते दरोडेखोर नसतात, अशी टीका राष्ट्रवादीवर केली होती. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना या टीकेवर विचारले असता झोपेतही चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादीचे नाव घेतात, त्यांचे बोलणे तुम्ही मनावर का घेता, असा टोला त्यांनी लगावला आहे.

बुधवारपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच २८ टक्के महागाई भत्त्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण गुरुवारी रात्री मागे घेतले. एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने महागाई भत्त्याबरोबरच काही मागण्या मान्य झाल्यामुळे हा निर्णय घेतला. पण कृती समितीने घेतलेली भूमिका मान्य नसल्याचे म्हणत सोलापुरात एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारले. शासनासोबत कृती समिती डील करते, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी सहकारमंत्री सुभाष देसाई पोहोचले होते. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.

सांगलीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये सलगी करत असल्याचे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, राष्ट्रवादी हा कधीच भरवशाचा पक्ष नाही. सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी एक राजकारण करतात. एकवेळ काँग्रेस परवडली. काँग्रेसमधील सगळी व्यक्तिमत्वे सुसंस्कृत असतात, ते दरोडेखोर नसतात. राष्ट्रवादीने सलगी करणे यासाठी भाजप कधीही भुलणार नाही. भाजपासोबत राष्ट्रवादी सलगी करण्याच्या त्यांच्या डावाला फसणार नसल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.