आजपासून सोलापूर मार्गावर धावणार हुतात्मा, सिद्धेश्वर एक्सप्रेससह 17 रेल्वे


मुंबई – : सोलापूर विभागातील दौंड-कुर्डूवाडी सेक्शनमधील भाळवणी ते वाशिंबे स्थानकादरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे आजपासून मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी सिद्धेश्वर, हुतात्मा एक्सप्रेससह अन्य 15 एक्सप्रेस गाड्या सुरू होणार आहेत. महत्त्वाच्या गाड्या ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरू झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील दोन महिन्यापांसून भाळवणी ते वाशिंबे दरम्यान (26.33 किलोमीटर) रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी काही गाड्या बंद तर काही गांड्याचा मार्ग बदलण्यात आला होता. आता हे काम पूर्ण झाल्यामुळे आता पुन्हा एकदा हुतात्मा, सिद्धेश्वर एक्सप्रेसह अन्य गाड्या धावणार आहेत.

25 ऑक्टोबर रोजी भाळवणी ते वाशिंबे या स्थानकादरम्यान सुरु असलेले दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले. रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज आरोरा यांनी कामांसोबत सिग्नलच्या यंत्रणेची पाहणी केल्यानंतर मागील दोन-तीन महिन्यांपासून बंद असलेल्या सर्व गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला.

सोलापूर मार्गावरुन या एक्सप्रेस गाड्या पुन्हा धावणार

  • 01139 मुंबई-गदग विशेष एक्सप्रेस
  • 01140 गदग-मुंबई विशेष एक्सप्रेस
  • 02116 सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस
  • 02115 मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस
  • 02207 मुंबई-लातूर विशेष एक्सप्रेस
  • 02208 लातूर-मुंबई विशेष एक्सप्रेस
  • 02043 मुंबई-बिदर विशेष एक्सप्रेस
  • 02044 बिदर-मुंबई विशेष एक्सप्रेस
  • 06237 म्हैसूर-साईनगर शिर्डी विशेष एक्सप्रेस
  • 06238 साईनगर शिर्डी-म्हैसूर विशेष एक्सप्रेस
  • 07614 नांदेड-पनवेल विशेष एक्सप्रेस
  • 07613 पनवेल-नांदेड विशेष एक्सप्रेस
  • 07014 हैद्राबाद-हडपसर विशेष एक्सप्रेस
  • 07013 बिदर-मुंबई विशेष एक्सप्रेस
  • 07015 मुंबई-बिदर विशेष एक्सप्रेस
  • 01157/01158 पुणे-सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेस

मार्गात बदल करण्यात आलेल्या या एक्‍सप्रेस आपल्या निर्धारित स्थानकावरून धावतील

  • सांगोला-आर्दशनगर (दिल्ली) किसान रेल्वे
  • सांगोला-मुजफ्फरपूर किसान रेल्वे
  • सांगोला-शालिमार किसान रेल्वे
  • लोकमान्य टिळक टर्मिनस-मदुराई
  • मदुराई- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍सप्रेस
  • भुनेश्वर-पुणे एक्‍सप्रेस
  • पुणे-भुनेश्वर एक्‍सप्रेस
  • नागरकोईल-मुंबई एक्‍सप्रेस
  • मुंबई- नागरकोईल एक्‍सप्रेस
  • नागरकोईल-मुंबई एक्‍सप्रेस
  • मुंबई- नागरकोईल एक्‍सप्रेस
  • विशाखापट्टणम-एलटीटी एक्‍सप्रेस
  • एलटीटी-विशाखापट्टणम एक्‍सप्रेस
  • म्हैसूर-वाराणसी एक्‍सप्रेस
  • वाराणसी- म्हैसूर एक्‍सप्रेस