चेंबूर येथील संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतिगृहासाठी भोजन दरपत्रके मागविण्याबाबत आवाहन


मुंबई : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर या कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतिगृह, चेंबूर या वसतिगृहाच्या भोजन ठेक्याकरिता दरपत्रके मागविण्यात आली आहेत.

संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतिगृह, चेंबूर या वसतिगृहाची विद्यार्थी संख्या १५० आहे. या वसतिगृहाच्या विदयार्थ्यांना भोजन पुरवठा करण्याकरिता भोजनाची ठेका दरपत्रके मागविण्यात येत आहेत. तरी ज्या भोजन पुरवठादारांकडे भोजन पुरवठा परवाना आहे अशा पुरवठादारांनी याकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर.सी.मार्ग, चेंबूर (पू.), मुंबई-७१ येथे संपर्क साधावा.असे पत्रकाव्दारे मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त, समाज कल्याण, प्रसाद खैरनार यांनी कळविले आहे.