जय श्रीराम पोस्टर्स नी ममता दीदींचे गोव्यात स्वागत

प.बंगालच्या बाहेर पडून भाजपला टक्कर देण्यासाठी तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांनी गोव्याकडे लक्ष वळविले असून त्या प्रथमच गुरुवारी गोव्यात दाखल झाल्या आहेत. दोन दिवसांच्या भेटीवर आलेल्या ममतांच्या स्वागताला जागोजागी भली मोठी पोस्टर्स लागली असून विशेष म्हणजे ;जय श्रीराम’ इतकेच लिहिलेली हि पोस्टर सर्व गोव्यात रातोरात लावली गेली आहेत.

बगव्या रंगात ‘जय श्रीराम’ लिहिलेल्या या पोस्टरचे विशेष म्हणजे त्यावर कुठेही कुणाचे नाव, पक्ष चिन्ह, निशाणी, नेते फोटो असा कुठलाही उल्लेख नाही. ही पोस्टर कुणी लावली याची काहीही माहिती नाही.या वर्षी मार्च एप्रिल मध्ये पश्चिम बंगाल निवडणुकात बीजेपीने जय श्रीराम नारा अतिशय प्रभावीपणे वापरलं होता आणि मुख्यमंत्री ममता दीदी जेथे जातील थेथे तेथे याच घोषणा दिल्या जात होत्या. या मुळे ममता दिदी अनेकदा प्रचंड संतापल्या होत्या आणि अनेकदा कार्यक्रम अर्धवट सोडून निघून गेल्या होत्या. त्यामुळे आता या पोस्टरवर ममतांची काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ज्येष्ठ पत्रकार किशोर नायगावकर या संदर्भात म्हणाले, ज्या दिवशी तृणमूल आणि आयपॅकने गोव्यात काम सुरु केले तेव्हाच ममता हिंदू विरोधी आणि मुस्लीम समर्थक असल्याची भावना निर्माण केली गेली होती. ममता आल्या तर गोव्यात रोहिंग्या मुस्लीम कायमची वस्ती करतील अशी भीती सुद्धा दाखविली जात होती. गोव्यात ६५ टक्के जनता हिंदू असून ३० टक्के क्रिश्चन आहेत. मुस्लीम ५ टक्के आहेत. ख्रिश्चन समुदाय पूर्वी कॉंग्रेसचा मतदार होता पण मनोहर पर्रीकर आल्यानंतर हा समुदाय भाजप कडे मोठ्या संखेने वळला होता. गोव्यात आम पार्टी, कॉंग्रेस, भाजप आणि आता तृणमूल सर्वांच्या नजरा ख्रिश्चन समाजावरच आहेत.