अमेरिकेने जारी केला पहिला ‘एक्स’ जेन्डर पासपोर्ट
अमेरिकन परराष्ट्र विभागाने २८ ऑक्टोबर रोजी देशात पहिला ‘एक्स’ जेन्डर पासपोर्ट जारी केल्याची घोषणा केली आहे. असा पासपोर्ट ज्यांना आपली ओळख महिला किंवा पुरुष स्वरुपात नको आहे म्हणजेच ज्यांना त्यांच्या जेन्डरचा उल्लेख नको आहे त्यांच्यासाठी जारी केला जाणार आहे. एलजीबीटीक्यू समूहाचा हा अधिकार असून हा वास्तविकतेच स्वीकार आहे असे मत या संदर्भात परराष्ट्र विभागाच्या विशेष दूतानी केला आहे. परराष्ट्र विभागाने परदेशी जन्म झालेल्या अमेरिकन नागरिकांना पासपोर्ट आणि जन्म प्रमाणपत्र देण्यासाठी पुढच्या वर्षात अधिक व्यापक रुपात पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सक्षमीकरण केले जात असल्याचे जाहीर केले आहे.
जून महिन्यात या विभागाने अशी घोषणा केली होती कि, गैरबायनरी, इंटरसेक्स व लिंग गैरअनुरूप व्यक्तीसाठी तिसरा जेन्डर पर्याय देण्याचे काम सुरु केले गेले आहे. त्यासाठी वेळ लागणार आहे कारण त्यासाठी संगणक सिस्टीमचे अपग्रेडेशन करावे लागणार आहे. सध्या असा पहिला पासपोर्ट जारी केला गेला आहे. मात्र यासाठी बजेट कार्यालयाकडून अनुमोदन घेणे आवश्यक आहे. हाच विभाग सर्व सरकारी अर्जांना मंजुरी देत असतो.
आता जेन्डर पर्याय देताना वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज संपुष्टात आली असून चालक परवाना, जन्मप्रमाणपत्र या पेक्षा हे वेगळे पाउल आहे. त्यामुळे ते ऐतिहासिक आणि वास्तविकता स्वीकार केल्याचे द्योतक ठरले आहे. अमेरिकन अध्यक्ष जो बायडेन यांनी एलजीबीटीक्यू अधिकारासाठी प्रशासनाकडून प्राधान्य दिले जाईल असा वादा निवडणूक प्रचारावेळी केला होता. स्वतंत्र ओळख मिळाल्याने हे लोक सन्मानाने समाजात राहू शकतील असे मत व्यक्त केले जात आहे.