नेटकरी सब्यसाचीच्या नवीन मंगळसूत्र जाहिरातीवर संतापले


आपल्या नवीन मंगळसूत्र कलेक्शनमुळे प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसंची मुखर्जी प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. त्याने लग्नाच्या पवित्र बंधनाचे प्रतिक आणि लग्नाचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या मंगळसूत्राचे नवे कलेक्शन लॉंच करण्यासाठी ज्या प्रकारच्या जाहिरातीचा अवलंब केला आहे, त्यामुळे तो ट्रोल होत आहे. आपल्या इंस्टाग्रामवर लेटेस्ट डिझाइन मंगळसूत्राचा फोटो सब्यसाचीने शेअर केला आहे. फॅशन डिझायनरच्या मॉडेलने डेनिम आणि ब्रा परिधान करून फोटो सेशन केले आहे, जे नेटकऱ्यांना आवडले नाहीत.

रॉयल बंगाल मंगळसूत्र इंटिमेट फाइन ज्वेलरी कलेक्शन सब्यसाचीच्या लक्झरी लेबलने लॉंच केले आहे. मंगळसूत्राची किंमत १ लाख ६५ हजार रुपयांपासून सुरू आहे. आपल्या इंस्टाग्रामवर सब्यसाचीने मंगळसूत्रची जाहिरात करत फोटो शेअर केले आणि ‘द रॉयल बंगाल मंगळसूत्र’ असे कॅप्शनमध्ये लिहिले.


एका पोस्टमध्ये सब्यसाचीने ‘बेंगाल टायगर आयकॉन कलेक्शन ऑफ नेकलेस, व्हीव्हीएस डायमंड्स, ब्लॅक ऑनिक्स आणि कानातले आणि काळ्या आणि १८ कॅरेटमधील अंगठ्या’ असे लिहिले आहे. सब्यसाचीच्या जाहिरातीत एका महिलेने ब्रा आणि मंगळसूत्र घातले आहे, तर पुरुष मॉडेलही शर्टलेस आहे. मंगळसूत्र हा एक पवित्र दागिना मानला जातो, जो हिंदू स्त्रिया लग्नानंतर घालतात. लग्नाच्या वेळी वर आपल्या वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालून आपला जीवनसाथी बनवतो. पवित्र नाते दिसू नये म्हणून काळे मोतीही घातले जातात. पण ज्या पद्धतीने सब्यसाचीने ते सादर केले, त्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला आहे.

नग्नता मंगळसूत्राच्या जाहिरातीत दाखवल्याबद्दल सोशल मीडिया यूजर्स संतापले आहेत. कोणीतरी याबद्दल तक्रार करण्यास सांगितले आहे. तर कोणीतरी सब्यसाचीवर बहिष्कार घालण्याची मागणी करत पोस्ट करत आहे. सब्यसाचीला ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तो या वर्षी ऑगस्टमध्ये, एच एंड एम ब्रँडसह फास्ट फॅशन प्रमोशनसाठी देखील ट्रोल झाला होता. तथापि, सोशल मीडियावर ब्रँड्सवर टीका करणे सामान्य आहे. अलीकडेच, फॅब इंडियाच्या दिवाळी कलेक्शन ‘जश्न-ए-रिवाज’ दाखवणारी जाहिरात बिंदी न घातल्याबद्दल अनेक ट्रोल झाल्यानंतर काढण्यात आली. त्याचवेळी करवा चौथवरील एका जाहिरातीमुळे डाबर ब्रँडही ट्रोल झाला होता.