क्रांती रेडकरचे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र


मुंबई – कॉर्डेलिया क्रुझ प्रकरणात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. समीर आणि त्यांच्या कुटुंबावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विविध आरोप केले आहेत. या गंभीर आरोपांनंतर त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला होता. यानंतर आता क्रांतीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. आज मी तुमच्याकडे एक मराठी माणूस म्हणून न्यायाच्या अपेक्षेने पाहत आहे, तुम्ही योग्य तो न्याय करा, अशी विनंती क्रांतीने उद्धव ठाकरेंना पत्राद्वारे केली आहे.

क्रांतीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र